आपला जिल्हाक्राईम न्युजमहाराष्ट्र

किशोर आवारे हत्येप्रकरणी झालेल्या आरोपांवर पत्रकार परिषद घेत सुनील शेळकेंकडून खंडण..

Spread the love

किशोर आवारे हत्येप्रकरणी झालेल्या आरोपांवर पत्रकार परिषद घेत सुनील शेळकेंकडून खंडण.Sunil Shelken’s rebuttal in a press conference on the allegations made in the murder of Kishore Aware.

आवाज न्यूज :  मावळ प्रतिनिधी १३ मे.

जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या हत्येने परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. या हत्येप्रकरणात मावळचे आमदार सुनील शेळके यांच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. याबाबत त्यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. किशोर आवारे यांची हत्या झाल्यानंतर सुनील शेळके नॉट रिचेअब असल्याच्या बातम्या काल चालवण्यात आल्या. या प्रकरणात आरोपींची चौकशी पोलीसांकडून केली जात आहे. मागील काही दिवसापुर्वी किशोर आवारे यांच्यासोबत आम्ही राजकारणार एकत्रित काम केलं आहे. त्यांच्यात विचारांत मतभेद होते परंतु मनभेद नव्हते. परंतु काही लोकांकडून जाणीवपुर्वक राजकारण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं सुनील शेळके यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सांगितलं आहे.

याप्रकरणात जी काही सत्यता आहे ती बाहेर येईल. त्यामुळे या घटनेला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करू नये असंही त्यांनी म्हटले आहे.

या घटनेनंतर माझा भाऊ सुधाकर शेळके, संदीप गराडे यांच्यासह माझ्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. अन् या तक्रारीत किशोर आवारे यांच्या हत्येचा कट रचण्यात आलं आहे. असं सांगण्यात आलं. तक्रार दाखल करतांना त्यांच्या कुटुंबीयाची भावना काय असते ती समजून आहे. परंतु तक्रार दाखल करण्यामागे याचे सुत्राधार कोण आहेत. हे पुढील काळात याचा शोध घेण्याचा प्रयत्न करू. तसेच आम्ही विकासाचं राजकारण केलं आहे. असं घाणरेड राजकारण कधीही करणार नाही. असं म्हणत सुनील शेळके यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.

 

दरम्यान, मला लोकांनी कामांसाठी, विकासासाठी निवडून दिलं आहे. राजकारणापासून आलिप्त व्हायचं असेल तर आज होईन. परंतु बदनाम करून तुम्ही मला बाजूला करण्याचा प्रयत्न करत असाल तर असले आरोप कधीही स्विकारणार नाही. अन् याप्रकरणात कुठल्याही चौकशीसाठी मी तयार आहे, माझी चौकशी करा. तसेच या प्रकरणात कोण राजकारण करत आहे. त्यांची देखील चौकशी झाली पाहिजे. असंही सुनील शेळके यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!