ताज्या घडामोडी

आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेल्या निर्भीड पत्रकारितेची आजही समाजाला गरज. ज्येष्ठ पत्रकार,सुरेश साखवळकर …

Spread the love

आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेल्या निर्भीड पत्रकारितेची आजही समाजाला गरज. ज्येष्ठ पत्रकार,सुरेश साखवळकर …Society still needs the fearless journalism started by the first journalist Acharya Balshastri Jambhekar. Senior Journalist, Suresh Sakhwalkar…

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर १७ मे.

आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेल्या निर्भीड पत्रकारितेची आजही समाजाला गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणी शास्त्रीय संगीत क्षेत्रातील दिग्गज पं.सुरेश साखवळकर यांनी केले.

आद्य पत्रकार आचार्य बाळशास्री जांभेकर यांचे १७७ व्या पुण्यतिथी निमित्ताने तळेगाव दाभाडे शहर पत्रकार संघाचे वतीने आयोजित अभिवादन सभेत पं साखवळकर हे बोलत होते.सभेच्या अध्यक्षस्थानी मनोहर दाभाडे हे होते.

यावेळी बोलताना पं.साखवळकर म्हणाले की आचार्य बाळशास्री जांभेकर यांच्या पत्रकारितेचा काळ अतिशय खडतर होता. आपल्या देशात इंग्रजाची एकहाती सत्ता होती. तर भारतीय समाज विविध जाती धर्म रुढी परंपरांमध्ये अडकल्याने समाजात एकी नव्हती. अशावेळी आचार्य बाळशास्री जांभेकर यांनी आपली निर्भिड लेखणी चालवली.

यावेळी उपस्थित पत्रकारांनी आचार्य बाळशास्री जांभेकर यांचे प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. पत्रकार संघाचे सचिव सोनबा गोपाळे गुरूजी यांनी प्रास्ताविक व स्वागत केले तर राजेश बारणे यांनी आभार मानले.

यावेळी  बी एम भसे, सोनबा गोपाळे गुरूजी,सुनील वाळुंज, तात्यासाहेब धांडे, अतुल पवार, प्रभाकर तुमकर, राजेश बारणे, राजेंद्र जगताप, श्रीकांत चेपे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!