अध्यात्मिकआपला जिल्हा

मावळ तालुका वारकरी सांप्रदायाचे वतीने निवासि बालवारकरी संस्कार शिबीराची कीर्तनसेवेने सांगता.

Spread the love

मावळ तालुका वारकरी सांप्रदायाचे वतीने निवासी बालवारकरी संस्कार शिबीराची कीर्तनसेवेने सांगता.On behalf of the Maval Taluka Warkari Sampradaya, the residential Balwarkari Sanskar camp is conducted with kirtan service.

आवाज न्यूज लोणावळा प्रतिनिधी, १९ मे.

मावळ तालुका वारकरी सांप्रदायाचे वतीने निवासि बालवारकरी संस्कार शिबीराची कीर्तनसेवेने सांगता ता.२१ रोजी होणार आहे.ह.भ.प.नाथा महाराज शेलार यांची सकाळी ९ ते ११ कीर्तनसेवा होणार असून त्यानंतर स्वागत समारंभ , पालकांची मनोगते व मान्यवर पाहुणे यांची मनोगते होणार आहेत.

दहिवलीचे संस्कार शाला आश्रमाचे प्रमुख मुरारीलाल शर्मा यांचे यावेळी प्रमुख मार्गदर्शन होणार असून भाजपचे नेते पुणे जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष व संचालक बाळासाहेब नेवाळे , मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाचे उपाध्यक्ष सुभाषमहाराज पडवळ , पवनमावळ दिंडी समाजाचे उपाध्यक्ष भागुजी ठोंबरे , देवराई संस्थेचे अध्यक्ष सुकनशेठ बाफना आदी मान्यवरांचे प्रमुख उपस्थितीमधे बालसंस्कार शिबीरातील विद्यार्थांना प्रशस्तिपञके प्रदान करण्यात येणार आहे.

यानंतर मान्यवरांची मार्गदर्शनपर भाषणे होईल.
असे निवासी बालवारकरी संस्कार शिबीराचे प्रमुख .ह.भ.प.रोहिदास महाराज जगदाळे , मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाचे अध्यक्ष. नंदकुमार भसे , कार्याध्यक्ष संतोषभाऊ कुंभार , उपाध्यक्ष दिलीपशेठ वावरे आणि सेक्रेटरी रामदास पडवळ यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!