ऐतिहासिक

जागतिक वस्तु संग्रहालय दिनाच्या अनुषंगाने प्रत्येकाने शिवशाही ऐतिहासिक वस्तू संग्रहालयला भेट द्या आणी आपल्या भारतमातेचा गौरवी इतिहास समजून घ्या.डॉ. प्रमोद बोराडे (इतिहास विभागप्रमुख )

Spread the love

जागतिक वस्तु संग्रहालय दिनाच्या अनुषंगाने प्रत्येकाने शिवशाही ऐतिहासिक वस्तू संग्रहालयला भेट द्या आणी आपल्या भारतमातेचा गौरवी इतिहास समजून घ्या.डॉ. प्रमोद बोराडे (इतिहास विभागप्रमुख )On the occasion of World Artifacts Day everyone should visit the Shivshahi Historical Artifacts Museum and understand the glorious history of our motherland.Dr. Pramod Borade (Head of History Department)

आवाज न्यूज: तळेगाव दाभाडे वार्ताहर, १९ मे.

ऐतिहासिक वस्तू संग्रहालय हे ज्ञानाचे विद्यापीठ असते. गतकाळात घडून गेलेल्या गोष्टी आपल्याला प्रत्यक्ष माहिती व घटना संग्रहालयाच्या माध्यमातून कळतात. संग्रहालयातील ऐतिहासिक वस्तू आपल्याला त्या काळाचे अधिकांश ज्ञान देतात म्हणून संग्रहालये ही बोलकी आणी प्राथमिक संदर्भाची सर्वोच्च व अस्सल माहिती देणारी विद्यापीठ आहेत.
जागतिक दृष्टीने संग्रहालयास विशेष महत्व आहे मात्र भारतात या संग्रहालयशास्राचा म्हणावा तेवढा विकास झालेला नाही किंबहुना वस्तू संवर्धनाच्या प्रेरणा विकसित नाहीत. अधिकांश लोकांनी भारतातील ऐतिहासिक वस्तू संग्रहालये पहावी. आपल्या भारतामातेचा गौरवशाली व वैभवी इतिहास या माध्यमातून समजून घ्यावा.

मावळ तालुक्यात अलीकडच्या काळात दोन ऐतिहासिक वस्तू संग्रहालय उभी राहिली ही इतिहास विषयाच्या दृष्टीने सकारात्मक बाब म्हणावी लागेल. जरूर प्रत्येकाने शिवशाही ऐतिहासिक वस्तू संग्रहालयला भेट द्या आणी आपल्या भारतमातेचा गौरवी इतिहास समजून घ्या…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!