ऐतिहासिकपर्यटनमावळ

लोहगड विजय स्मृतिदिन उत्साहात साजरा.

श्रीमंत सरदार विठोजी कारके व सरदार नावजी बलकवडे यांचा लोहगड विजय स्मृतिदिन लोहगड किल्ला येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

Spread the love

लोहगड विजय स्मृतिदिन उत्साहात साजरा ;श्रीमंत सरदार विठोजी कारके व सरदार नावजी बलकवडे यांचा लोहगड विजय स्मृतिदिन लोहगड किल्ला येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.Lohgad Victory Commemoration Day celebrated with enthusiasm; 

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, २७ ऑगष्ट.

श्रीमंत सरदार विठोजी कारके व सरदार नावजी बलकवडे यांचा लोहगड विजय स्मृतिदिन लोहगड किल्ला येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, सहायक पोलिस निरीक्षक उमेश कारके, शिवव्याख्याते सचिन ढोबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमास शिवसेना नेते भारत ठाकूर, तळेगावचे माजी नगराध्यक्ष कृष्णा कारके, पंचायत समितीचे माजी सदस्य साहेबराव कारके, माजी सरपंच बाळासाहेब कारके नारायण कारके  अशोक कारके, ऋषिकेश कारके, सचिन टेकवडे, शिरीषमहाराज मोरे, कुंदन कारके, संजय कारके, योगेश कारके व उर्से, डोणे, आढे, देहू, लोहगड येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

मंदिरांमध्ये पूजा-अर्चा इसवी सन २२ ऑगस्ट १६९२ मध्ये सरदार विठोजी कारके, सरदार नावजी बलकवडे यांनी मुघलांचे किल्लेदार मंजूर खान यांच्याशी युद्ध करून लोहगड किल्ल्यावर विजय मिळवला होता. त्यामुळे दरवर्षी लोहगड किल्ल्यावर स्मृतिदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या वेळी किल्ले लोहगड येथील शिव मंदिरामध्ये तसेच कार्ला येथील एकवीरा देवी मंदिरात पूजा करण्यात आली.

गौरवशाली इतिहासातून तरुणांनी प्रेरणा घ्यावी शिवव्याख्याते सचिन ढोबळे यांनी आपल्या पराक्रमी पूर्वजांकडून व गौरवशाली इतिहासातून प्रेरणा घेऊन तरुणांनी देशोन्नतीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन केले.

इतिहास संशोधक डॉ. प्रमोद बोऱ्हाडे यांनी बोलताना सरदार बलकवडे व सरदार कारके यांनी भर पावसाळ्यात श्रावण महिन्यात शत्रूशी झुंज देऊन यश मिळवले होते, हे गौरवास्पद असल्याचा उल्लेख केला.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!