अध्यात्मिकमावळ

शिव कालीन कालीका मंदिर देवस्थानच्या भव्य प्रवेद्वाराचा शिळारोहण कार्यक्रम संपन्न..

उद्योजक महेश काळे यांच्या हस्ते देवीची विधिवत पुजा करण्यात आली.

Spread the love

शिव कालीन कालीका मंदिर देवस्थानच्या भव्य प्रवेद्वाराचा शिळारोहण कार्यक्रम संपन्न..The rock climbing program of the grand Pravedwara of the Kalika temple devasthan of Shiva period is completed..

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २७ ऑगष्ट.

तळेगाव दाभाडे येथील मुख्य बाजारपेठेत असणारे हे प्राचीन मंदिर याचे, काल शनिवार दि. २६/८/२०२३ रोजी शिव कालीन कालीका मंदिर देवस्थानच्या भव्य प्रवेद्वाराचे शिळारोहण कार्यक्रम पार पडला. उद्योजक  महेश काळे व कोरडे काका यांच्या हस्ते देवीची विधिवत पुजा करुन कामाची सुरुवात करण्यात आली.

उपस्थित सर्वच मान्यवरांनी बांधकामाची सुरुवात करण्यासाठी पुजा व नारळ वाढवून बांधकामास सुरुवात केली. महेश काळे यांचे तळेगाव दाभाडे येथील मंदिरासाठी व सामाजिक कामासाठी कायमच  मदतीचा हात असतो, अशा प्राचीन वास्तुचे पुजा करण्याचे भाग्य मला लाभले, असे वक्तव्य काळे यांनी आवाज न्यूज प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.

सदरच्या कार्यक्रमास सर्व समिती सदस्य व मुख्य विश्वस्त बाळासाहेब गोरे , वैभव कोतुळकर, बाळतात्या भेगडे, सोपानराव टकले. यतिश गोरे, परिसरातील व्यापारी वर्ग व मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!