आरोग्य व शिक्षणमावळ

निवृत्त सनदी अधिकारी मधुकर कोकाटे यांची इंद्रायणी महाविद्यालयास सदिच्छा भेट..

महाविद्यालयाच्या प्रगतीचा त्यांनी घेतला आढावा..

Spread the love

निवृत्त सनदी अधिकारी मधुकर कोकाटे यांची इंद्रायणी महाविद्यालयास सदिच्छा भेट..Retired Chartered Officer Madhukar Kokate’s goodwill visit to Indrayani College..

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २७ ऑगष्ट.

निवृत्त सनदी अधिकारी मधुकर कोकाटे यांनी तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्या मंदिर संचलित इंद्रायणी महाविद्यालयास सदिच्छा भेट दिली. महाविद्यालयाच्या प्रगतीचा त्यांनी आढावा घेतला.

आपल्या प्रशासकीय कारकिर्दीतील स्वानुभव कथन करून त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. महाविद्यालय राबवत असलेल्या स्तुत्य उपक्रमाचे कोकाटे यांनी कौतुक केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत
शेटे, उद्योजक धनंजय तायडे, प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, गोरखनाथ काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.

रामदास काकडे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. कोकाटे यांच्या भरीव योगदानाची माहिती यावेळी काकडे यांनी उपस्थित प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना दिली. रामदास काकडे यांना भारतरत्न जे. आर. डी. टाटा उद्योगरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल मधुकर कोकाटे यांच्या हस्ते काकडे यांचा सन्मान करण्यात आला. डॉ. संभाजी मलघे यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!