अध्यात्मिकमहाराष्ट्र

आराध्य दैवत  खंडोबा मंदिराचा गाभारा भाविकांना दर्शनासाठी बंद..

गडावर येणाऱ्या भाविकांच्या अभिषेक महापूजा या पंचलिंग भुलेश्वर मंदिरात करण्यात येणार

Spread the love

आराध्य दैवत  खंडोबा मंदिराचा गाभारा भाविकांना दर्शनासाठी बंद,  गडावर येणाऱ्या भाविकांच्या अभिषेक महापूजा या पंचलिंग भुलेश्वर मंदिरात करण्यात येणार.Gabhara of Aradhya Deivat Khandoba temple will be closed to devotees for darshan, Abhishek Mahapuja of devotees coming to the fort will be performed in Panchalinga Bhuleshwar temple.

आवाज न्यूज : विशेष वार्ताहर, २७ ऑगष्ट.

पुरातत्व खात्याकडून जेजुरीच्या खंडोबा गडामधील मुख्य स्वयंभू लिंगाचा आणि अश्वाच्या गाभा-याचे  दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे (सोमवार)२८ ऑगष्ट पासून मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे.

दीड महिना  ऑक्टोंबरपर्यंत गाभारा दुरुस्तीचे काम चालणार असून या काळात गडावर आलेल्या भाविकांना कासवापासून बाहेरुनच देवाचे दर्शन घ्यावे लागणार असून या दोन्ही गाभाऱ्यात जाता येणार नाही. गडावर कुलधर्म कुलाचार करण्यास कोणतीही अडचण नाही.मुख्य गाभाऱ्याचे काम सुरू असताना गडावर येणाऱ्या भाविकांच्या अभिषेक महापूजा या पंचलिंग भुलेश्वर मंदिरात करण्यात येणार आहे. आतील गाभाऱ्याचे काम पूर्ण झाल्यावर पंचलिंग मंदिराचे काम करताना भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मुख्य मंदिरात पूजा करून द्याव्यात अशी मागणी करण्यात आली.

खंडोबा गडाच्या गाभाऱ्याचे दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने भाविकांना गडावर येऊन आपले कुलधर्म कुलाचार करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. खंडोबाची त्रिकाळ पूजा नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे. मात्र, इतर कोणालाही गाभाऱ्यामध्ये दर्शनासाठी जाता येणार नाही.

पुजारी, सेवक आणि भाविकांची सोय बघूनच विकास कामे केली जात आहेत. खंडोबा गडाचे संवर्धन करण्यासाठी करण्यात येत असलेल्या विकास कामांना सहकार्य करण्याचे आवाहन विश्वस्त मंडळाने केले. विकास कामे व्यवस्थित पार पाडण्यासाठी पुजारी, सेवक, नित्य सेवेकरी आणि विश्वस्त मंडळाची समिती तयार करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!