आपला जिल्हानिधनवार्ता

वडगाव येथील नामदेव वारिंगे यांचा कामावर जात आसता , कंटेनर च्या धडकेने अपघातात मृत्यू .

Spread the love

वडगाव येथील नामदेव वारिंगे यांचा कामावर जात आसता , कंटेनर च्या धडकेने अपघातात मृत्यू .Namdev Waringe from Vadgaon died in an accident when he was hit by a container while going to work.

आवाज न्यूज :  लोणावळा प्रतिनिधी २० मे.

वडगाव येथील नामदेव तुळशीराम वारिंगे (वय-४३) यांचा बुधवारी ता.१७ रोजी तळेगाव एमाआयडीसी येथे कंपनी मधे कामावर जात आसता , कंटेनर च्या धडकेने आपघातात जागीच मृत्यू झाला.हा अपघात माळीनगर चौकात , वडगाव नगरपंचायत हद्दीत राञी ११ वाजता घडला.

अपघाताची खबर किरण शंकर भिल्लारे यांनी वडगाव पोलिस स्टेशनला दिली.पैलवान नामदेव तुळशीराम वारिंगे हे भाजपचे क्रीडा विभागाचे तालुकाध्यक्ष व पुणे जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे कार्यकारी सदस्य होते.
वडगाव पोलिस स्टेशनचे पोलिसनिरिक्षक विलास भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार कै.नामदेव वारिंगे हे तळेगाव एमआयडीसी मधील कंपनीत कामावर जाताना माळीनगर येथील जुना मुंबई पुणे महामार्ग ओलांडत असताना  कंटेनर क्रमांक एमएच४७एच २९०८ क्रमांकाच्या कंटेनर ने जोराची धडक देवून हा अपघात केला.यात गंभीरपणे जखमी झालेल्या वारिंगे यांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघाताचा तपास पोलिस फौजदार उमाजी मुंडे करीत आहे.

कै.नामदेव वारिंगे यांचे पार्थिवावर वडगाव येथील वैकुंठ स्मशानभूमित ता.१८ रोजी सकाळी साडेअकरा वाजताचे सुमारास शोकाकूल वातावरणात आंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांचे पश्चात वडील , एक भाऊ , पत्नी वैशाली वारिंगे , एक मुलगा , एक मुलगी , असा परिवार आहे. कै.वारिंगे हे तिरूपतीनगर सोसायटी चे अध्यक्ष होते.पैलवान मदन वारिंगे हे त्यांचे भाऊ होत.माळीनगर चौक बनला मृत्यूचा साफळा : माळीनगर चौकात दरवर्षी दहा बारा आपघात होऊन आनेक लोक मरण पावले आहेत.त्यामुळे हा चौक ब्लॕकस्पाॕट बनला आहे.येथे पीएमआरडीए ने व रस्ते विकास महामंडळ यांनी उड्डाणापूल उभारावा , किंवा भुयारी मार्ग बांधून वारंवार होणारे अपघात होणार नाही , अशी माळीनगर व वडगाव ग्रामस्थांची मागणी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!