देश विदेशमहाराष्ट्रसामाजिक

मोदी सरकारची दुसरी नोटबंदी; दोन हजारांच्या नोटा बंद होणार..

आरबीआयकडून २००० रुपयांची नोट बंद न करता ती रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरबीआयने या निर्णयाला ‘क्लीन नोट पॉलिसी’ असे म्हटले आहे.

Spread the love

मोदी सरकारची दुसरी नोटबंदी; दोन हजारांच्या नोटा बंद होणार…Modi government’s second demonetisation; 2000 notes will be discontinued…

आवाज न्यूज : प्रतिनिधी, २० मे.

दोन हजारांच्या नोटांची छपाई बंद करण्याचा निर्णय आरबीआयने घेतला आहे. त्यामुळे आता 30 सप्टेंबरनंतर दोन हजारांच्या नोटा चलनातून बंद होणार आहेत. 30 सप्टेंबरपर्यंत दोन हजारांच्या नोटा बँकेत जमा करण्याची मुदत देण्यात आली आहे.

आरबीआयने बाजारातून 2000 रुपयांच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, 30 सप्टेंबर 2023 पर्यंत या दोन हजारांच्या नोटा वापरता येणार आहेत, अशी माहिती आरबीआयने दिली आहे.त्यामुळे 30 सप्टेंबरपर्यंत दोन हजारांच्या नोटा वैध राहणार आहेत. 2018-19 मध्येच दोन हजारांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली होती, असंही सांगण्यात येत होतं.

दरम्यान, दोन हजार रुपयांच्या नोटा बँकांमध्ये बदलण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. 23 मे पासून ही प्रक्रिया सुरू होणार असून 30 सप्टेंबरपर्यंत नोटा बदलता येणार आहेत. यासाठी बँकेत एक वेगळी खिडकी सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती आरबीआयने दिली आहे.बक ऑफ इंडियाने शुक्रवारी (19 मे) संध्याकाळी 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाहेर काढण्यात येणार असल्याची धक्कादायक घोषणा केली. आरबीआयने हा 2000 रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय का घेतला व याबरोबरच नागरिकांना 2000 रुपयांच्या नोटा बदलून कशा घेता येईल हे सविस्तर जाणून  घेऊ.

8 नोव्हेंबर 2016 रोजी रात्री आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीची घोषणा केली. त्यावेळी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे बाजारातील चलनाची मागणी पूर्ण करण्यासाठी 2000 रुपयांची नोट जारी करण्यात आली होती.इतर मूल्यांच्या नोटा बँकांमध्ये पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्यानंतर हे उद्दिष्ट साध्य करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे 2018-19 मध्ये 2000 रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली होती. 2000 च्या नोटेचा हेतू पूर्ण झाला आहे.म्हणूनच आरबीआयने 2000 च्या या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

आरबीआयच्या प्रेस रिलीझमध्ये म्हटले आहे की, सामान्य व्यवहारांसाठी दोन हजार रुपयांची नोट वापरली जात नसल्याची बाब समोर आली होती. आरबीआयने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. यावरून हे स्पष्ट झाले आहे की, आरबीआयकडून 2000 रुपयांची नोट बंद न करता ती रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरबीआयने या निर्णयाला ‘क्लीन नोट पॉलिसी’ असे म्हटले आहे.रबीआयने दिलेल्या माहितीनुसार, नागरिकांना 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी आहे. 30 सप्टेंबरपर्यंत नागरिक या नोटा बदलून घेण्यासाठी बँकांमध्ये जाऊ शकतात. 23 मे पासून नोटा बदलण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

2 हजाराच्या नोटा बदलून घेण्यासाठी काही मर्यादा देखील आखून देण्यात आल्या आहेत. पण 2000 च्या कितीही नोटा तुम्ही बँकेत डिपॉझिट करू शकता त्यासाठी कोणतेही नियम लागू केलेले नाही. प्रत्येकजण एकावेळी फक्त 10 नोटा म्हणजेच 20 हजार रुपयांपर्यंतच्या नोटा बदलून घेऊ शकतो. विशेष म्हणजे तुम्ही कोणत्याही बँकेच्या शाखेतून नोटा बदलून घेऊ शकता. तसेच ग्रामीण भागात जिथे बँक नाही तिथे मोबाईल वॅनद्वारे नोटा बदलू शकता, असंही सांगितलं आहे.

एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बिझनेस करस्पॉन्डंट अकाउंटधारक एका दिवसाला चार हजार रुपयांपर्यंत नोटा प्रत्येकी एका दिवसाला बदलून घेऊ शकतात. याचा अर्थ बँकेत करंट अकाउंट असलेल्या ग्राहकांना दर दिवसाला चार हजार रुपयांपर्यंतच्या नोटा बदलून मिळू शकतात, असं मानलं जात आहे. पण बँकेकडून याबद्दल सविस्तर माहिती दिली जाऊ शकते. 2 हजारच्या नोटा जमा करण्यासाठी किंवा बदल करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे चार्जेस आकारले जाणार नाहीत.2000 च्या कितीही नोटा तुम्ही बँकेत डिपॉझिट करू शकता त्यासाठी कोणतीही नियम लागू केलेले नाही.महत्त्वाचा मुद्दा 2 हजाराच्या नोटा या चलानातून बाद झालेल्या नाहीत. त्यामुळे या नोटांच्या आधारावर व्यवहार होऊ शकतात. पण हे व्यवहार 30 सप्टेंबरपर्यंतच होऊ शकतात. तोपर्यंत या नोटा चलनात सुरु राहतील आणि व्यवहार होऊ (RBI) शकतात.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!