आपला जिल्हाक्राईम न्युज

कुरुळीतील ( चाकण ) इंग्लिश स्कूलच्या संस्थापक अध्यक्षाने महिलेला  मारली मिठी, संस्थापक अध्यक्षावर गुन्हा दाखल..

महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात भा.द. वि. कलम ३५४, ५०६ प्रमाणे गुन्ह्याची नोंद.

Spread the love

Founding President of English School in Kuruli (Chakan) hugged a woman, a case was registered against the founding president..कुरुळीतील ( चाकण ) इंग्लिश स्कूलच्या संस्थापक अध्यक्षाने महिलेला  मारली मिठी, संस्थापक अध्यक्षावर गुन्हा दाखल..

आवाज न्यूज : चाकण प्रतिनिधी २० मे.

चाकण औद्योगिक परिसरात महिलांच्या बाबतीत खूपच विचित्र घटना घडत असल्याचे समोर येत आहे. याला मोठ्या प्रमाणावर समाज घटकच जबाबदार असल्याचे जाणकार आपल्या भूमिकेतून स्पष्ट करत आहेत.

अशीच काहीशी घटना चाकण परिसरातील कुरुळी गावात घडल्याचे समोर आले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून, २ मे २०२३ रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास आनंद इंग्लिश स्कूल, कुरुळी येथे शाळेचे संस्थापक अध्यक्ष आरोपी अनिल काळे यांनी फिर्यादी महिलेला आपल्या केबीनमध्ये बोलावून नवीन शाळेचे कन्ट्रॅक्शन करायचे असल्याने त्याचा नकाशा काळे यांच्या टेबलावर ठेवला होता. त्या नकाशात नको असलेल्या गोष्टी खोडून टाकायच्या असल्याने काळे याने माझ्याकडे चष्मा नसल्याने त्याने फिर्यादी महिलेला व्हाईटणर पेन घेण्यास सांगून नको त्या नकाशावरील गोष्टी खोडण्यास सांगितल्या. आरोपी अनिल काळे याने सांगितल्या प्रमाणे फिर्यादी महिलेने नकाशा दुरुस्त केला.

त्यानंतर अनिल काळे याने तू बाहेर जाऊ नको मला तुझी मदत लागणार आहे असे सांगून पीडित महिलेला स्वत:च्या केबीनमध्येच थांबून ठेवले. त्यानंतर आरोपी अनिल काळे हा त्याच्या जवळच असलेल्या केबीनच्या आतील बाजूस गेला. तिथे गेल्यानंतर त्याने पीडित महिलेलाही त्या ठिकाणी बोलावून घेतले. त्यानंतर आरोपीने मला कसे तरी होत आहे आहे मला पाणी दे अशी पीडित महिलेकडे मागणी केली. त्यावेळी पीडित महिलेंने त्यास पाणीही दिले. पण त्यानंतर त्याची नीती फिरली आणि त्याने पीडित महिलेला तू मला खूप आवडते असे म्हणून जवळ ओढले व घट्ट मिठी मारली. पीडित महिला कशीबशी त्या नराधम आरोपी अनिल काळे याच्या तावडीतून सुटली. तेव्हा आरोपी अनिल काळे याने तू जर झाला प्रकार कुणाला सांगितला तर, तुला व तुझ्या नवर्‍याला कामावरुन काढून टाकण्याची धमकी दिली. या घडल्या प्रकारामुळे पीडित महिला खूप घाबरून गेली आहे. पण स्वत:वर झालेला अन्याय यापुढेही वाढायला नको म्हणून तिने पुढे येऊन आरोपी शाळेचा संस्थापक अध्यक्ष अनिल काळे यांच्या विरोधात महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात भा.द. वि. कलम ३५४, ५०६ प्रमाणे गुन्हा नोंदवला आहे.

चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये अशा घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. त्यात कितपत सत्य आहे याची पडताळणी पोलिस त्यांच्या माध्यमातून करतीलच. पण यात कुठे तरी पुरुषांनी कोणत्याही शारीरिक आकर्षणापाई वाहवत न जाता व महिलांनी कोणत्याही आर्थिक स्वार्थासाठी कुणाचा गैरवापर करणे योग्य नाही यावर कुठे तरी जरब बसायला हवा.

या प्रकरणाचा पुढील तपास महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रदीप गायकवाड हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!