आपला जिल्हापर्यटनमहाराष्ट्रसामाजिक

लोणावळा शहरात व भुशीडॕमवर पर्यटकांचा पाऊस..

पर्यटकांनी वर्षाविहारचा लुटला मनसोक्त आनंद.

Spread the love

लोणावळा शहरात व भुशीडॕमवर पर्यटकांचा पाऊस; पर्यटकांनी वर्षाविहारचा लुटला मनसोक्त आनंद.Rain of tourists in Lonavala city and Bhushidam; Tourists enjoyed the rain.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा प्रतिनिधी, १७ जुलै.

लोणावळा शहरात व भुशीडॕमवर पर्यटकांचा पाऊस पडल्यासारखी गर्दी रविवार असल्याने, झालेली पहायला मिळाली. भुशीडॕम पायऱ्यावर पर्यटकांची गर्दी प्रचंड झाल्यामुळे येथे पर्यटकांचा पाऊस पडल्यासारखे दिसत होते.पाणी दिसत नव्हते.खाली आलेल्या पाण्यातील सांडव्यावर महिला , तरूणांबरोबरच लहानथोर पाण्यामधे भिजण्याचा आनंद घेत होते..

सकाळपासून प्रत्येक पुणे लोणावळा लोकलने गर्दीचा लोंढा येत होता. कित्येक पर्यटकांचा कालपासूनच मुक्काम येथे होता. खाजगी बसेससने , कारने , मोटारसायकलवरून आलेल्या पर्यटकांची प्रचंड गर्दी झाली होती.भुशीडॕम , टाटालेक , टायगर पाँईंट , लायन्स पाँईंट , तसेच खंडाळा , कार्ला येथील लेणी व श्रीएकविरा देवी मंदिर परिसरात तसेच भाजेतील धबधब्यात डुंबताना , लेणीवर , लोहगड , विसापूर या गडकिल्ले व पर्यटन स्थळावर पर्यटकांचा गर्दीचा उच्चांक पहायला मिळाला. पाऊस जेमतेमच होता.

लोणावळा शहरचे पोलिस निरिक्षक सिताराम डुबल यांनी लोणावळा उपविभागीय पोलिसआधिकारी सहाय्यक पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांचे मार्गदर्शनाखाली पोलिसांचा मोठा बंदोबस्त वलवण नारायणीधाम चौक , गवळीवाडा येथील श्रीराम मंदिर चौक , अपोलो गॕरेज चौक , भगवान महावीर चौक , रायवूड हाॕटेल चौक , भांगरवाडी येथील लोहगड दर्शन चौक , वळकाईवाडी येथे चौक सहारा पुलावर टाटालेक परिसर व भुशीगाव पेट्रोल पंपाजवळ पोलिस व शिवदुर्ग मिञचे तरूण वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून कामात मग्न होते.

आयपीएस अधिकारी.कार्तिक हे आपल्या जीपमधून भुशीडॕम कडे जात असताना कैलासनगर मार्गे वर्धमान सोसायटी येथून आलेल्या व गवळीवाडा मार्गे आलेल्या वाहनांचे योग्य व्यवस्थापन केले जावे , यासाठी गाडीखाली उतरून वाहतूक नियंत्रण करणारे पोलिसआधिकारी यांना सुचना देताना दिसत होते.

 

भुशीडॕम येथे सायंकाळी पाचनंतर पायऱ्यावरून पर्यटकांना परत घरी जाण्यासाठी पोलिस व कर्मचारी यांना संघर्ष करावा लागत होता.. पोलिसांनी काठ्या हाती घेवूनच पर्यटकांना हाकलून लावायला सुरूवात केली.तरीही अनेक अतिउत्साही पर्यटक पायऱ्या वर पसून फोटो व सेल्फी घेण्यात आनंद मानत होते.

मक्याची भाजलेली कणसे , स्विटकाॕर्न , मसाला लावून खाण्यात तसेच वाफेवर मक्याचे दाणे मसाला लावून खाणे , काॕर्न भजी , वडापाव , चहा आणि चिकन , मटनाचे , मासे यांचे पदार्थ खाण्यासाठी पर्यटक हाॕटेलचा आधार घेताना , टपरीवर खाद्यपदार्थ खाताना दिसत होते.

जाईंटव्हील , लहानथोर मुलामुलींचे पाळणे , चक्र यांची जञा भरली होती. यास पावसात प्रतिसाद म्हणावा तितका नव्हता.
रस्त्याच्या कडेला अस्ताव्यस्त लावलेल्या मोटारसायकल व कारचे वर तात्काळ फोटो काढून व टोईंग व्हॕनचे मार्फत कारवाई करताना वहातूक पोलिस दिसत होते.

लोणावळा ग्रामिणचे पोलिस निरिक्षक किशोर धुमाळ यांनी टायगर पाँईंट , भाजेलेणी , भाजेतील धबधबा , लोहगड , विसापूर गडकिल्ले , कार्लालेणी , कार्लाफाटा , औंढेखुर्द येथील पुलाजवळ वाहतूक कोंडी होऊ नये , दुधिवरेखिंड येथेही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी चोख पोलिस बंदोबस्त लावला होता. श्रीएकविरा लाॕनजवळ औंढेखुर्द पुलाकडे भाजेतील वाहने वळविली आसल्याने येथे पाच सहा पोलिसआधिकारी व कर्मचारी दिवसभर बंदोबस्ताकरीता होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!