अध्यात्मिकआपला जिल्हामहाराष्ट्र

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने वारकऱ्यांना हडपसर शाखेतर्फे सालाबादप्रमाणे यंदाही फराळ व पाण्याचे वाटप..

Spread the love

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने वारकऱ्यांना हडपसर शाखेतर्फे सालाबादप्रमाणे यंदाही फराळ व पाण्याचे वाटप..

आवाज न्यूज : पुणे प्रतिनिधी, १७ जुन.

पाऊले चालती पंढरीची वाट, या वाटेवरील सर्वांचे श्रद्धास्थान असलेल्या वारकऱ्यांना आज हडपसर शाखेतर्फे सालाबादप्रमाणे यंदाही फराळ व पाणी वाटप करण्यात आले. सुमारे ३०० वारकऱ्यांची मनोभावे सेवा करण्याची संधी शाखेच्या सदस्य व पदाधिकाऱ्यांना मिळाली.

केवळ फराळ देणे हाच उद्देश न ठेवता त्यांच्याशी संवाद साधुन माणुसकीच्या नात्याने विचारपूस करण्यात आली, सोबत आपला पारंपरिक खेळ फुगड्या खेळण्यात आल्या व अतिशय जल्लोषात माऊली व तुकोबारायांच्या पालख्यांचे स्वागत करण्यात आले, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत होता, समाजाच्या प्रत्येक घटकांपर्यंत पोहचण्याचा एक यशस्वी प्रयत्न म्हणता येईल.

 

या वारीत संतोष वैद्य , राजेंद्र कुलकर्णी ,योगेश कुलकर्णी ,सुधीर मेथेकर , आकांक्षा देशपांडे ,अभिजित देशपांडे ,अतुल कुलकर्णी,अनिता काटे ,अमृता मेढेकर ,अशोक मेढेकर ,देवश्री बोधनी ,अश्विनी राजहंस,गायत्री मढीकर,सुरेखा कुवळेकर, वृषाली काटे,स्वप्ना औसेकर , अनिता कालकुंद्रे सर्व सन्मानीय हडपसर शाखा सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.

या उपक्रमासाठी अनेकांचे मदतीचे हात पुढे आले.सर्वांचे मनापासून आभार मानले खऱ्या अर्थाने ही वारी आनंद वारी ठरली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!