आपला जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

तळेगाव दाभाडे ( स्टेशन) विभागात नळाद्वारे पाणी पुरवठा करताय की विष पुरवठा ? निरज कुलकर्णी मनसे अध्यक्ष. तळेगाव दाभाडे.

तळेगाव दाभाडे (स्टेशन) येथील विविध प्रकारच्या समस्या सोडविण्यासाठी मनसे तर्फे मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन..

Spread the love

तळेगाव दाभाडे ( स्टेशन) विभागात नळाद्वारे पाणी पुरवठा करताय की विष पुरवठा ? निरज कुलकर्णी मनसे अध्यक्ष. तळेगाव दाभाडे.In Talegaon Dabhade (station) section water supply through tap or poison supply? Niraj Kulkarni MNS President. Talegaon Dabhade.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर १६ जुन.

तळेगाव स्टेशन भागातील रहिवाशांसाठी नगर पालिकेची स्वतंत्र पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहे. मात्र इंद्रायणी नदीत ज्या ठिकाणाहून पाणी उचलले जाते त्या ठिकाणी अजू बाजूची गाव, स्टेशन भागातील सर्व सांडपाणी सोडले जात असल्याचे चित्र आहे. हे पाणी शुद्धीकरणासाठी शुध्दीकरण यंत्रणेद्वारे शुध्दीकरण खरंच होते का ? हा संशोधनाचा भाग आहे. पाणी शुध्दीकरण न होताच सोडले जात आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे. नागरिकांचा हा प्रश्न आहे, की खरंच नळातून येणारे पाणी हे पाणी आहे की विष?? प्रशासनाने याकडे लक्ष वेधले पाहिजे, पावसाळा तोंडावर आला आहे. अशुद्ध पाण्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.तसेच स्टेशन भागात असलेल्या स्मशान भूमी जवळ एक डुक्कर कत्तल खाना चालू आहे ज्याचे रक्त खोड्या नाल्याद्वारे इंद्रायणी नदीत सोडले आहे. हे पाणी इंद्रायणी योजने अंतर्गत पाणी उपसा केंद्राच्या वरच्या बाजूला आहे आणि तेच पाणी उचलून लोकाना पिण्यासाठी सोडत आहे.

स्मशानभूमी जवळ असणाऱ्या कत्तलखाना,यशवंत नगर व स्टेशन भागात लहान मुले हरवणे , पळवून नेणे अश्या गोष्टी घडत आहेत, त्या संदर्भात यशवंत नगर मधील सर्व मुख्य चौकात कॅमेरे बसवणे,स्टेशन भागात पाणी कमी दाबाने येत आहे आणि कर्मचारी याच्याशी संपर्क साधला असता कायम एकच कारण समोर येते की मोटर जळाली आहे. आणि पावसाळा आला की पंप पाण्याच्या खाली गेला आहे हे कधी थांबणार, रात्रीच्या प्रमाणात चोरी चे प्रकार वाढले आहेत त्या अनुुुषंगाने रोज पोलीस पेट्रोलिंग ची गाडी पाठवावी.संपूर्ण महाराष्ट्रात  ४ चाकी गाडयांना काळ्या काचा बंदी असुन  सुद्धा बरेचशा काळ्या काचा असलेल्या गाड्या फिरताना दिसत आहेत त्यामुळे गाडीत कोण बसले आहे काय करत आहेत काहीच कळत नाही त्यामुळे चोरी , लहान मुले पळवणे असे प्रकार घडत आहेत  त्यावर कडक कार्यवाही करावी.तळेगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी. पाटील यांना  यशवंत नगर व स्टेशन भागातील विविध समस्या, निदर्शनास आणून त्यावर कारवाई करण्याची मागणी मनसे कडून करण्यात येत आहे.

डुक्कर कत्तलखान्याला परवानगी कोणी दिली ? आणि जर परवानगी दिली असेल तर आपण लोकांना एक प्रकारे विषच पाजत आहात असा अर्थ होईल आणि जर परवानगी दिली नसेल तर ह्यावर कठोर कार्यवाही होणे गरजेचे आहे.

यशवंत नगर भागातील इंद्रायणी शाळेच्या मागे , कातवी रोड, सरवस्ती शाळेच्या मागे , गोळवलकर मैदान( गोल मैदान ), बायोडायव्हर्सिटी पार्क , फ्रेंड्स ऑफ नेचर , इत्यादी भागात रात्रीच्या वेळेस रस्तावरील दिवे नसतात त्यामुळे लोकवस्ती असलेल्या ह्या भागात मद्यप्रेमी मोठमोठ्याने गाणे लावणे , दारू पिऊन धिंगाणा घालत, बाटल्या टाकून जात आहेत , असे प्रकार सहसा घडताना दिसत आहे  त्यावर अंकुश ठेवणार का ?. अशा प्रकारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निवेदनात म्हटले आहे.

 

याप्रसंगी तळेगाव शहराध्यक्ष रस्ते साधन सुविधा व आस्थापना विभाग मनसे निरज कुलकर्णी, मावळ तालुका सचिव पूजा कुलकर्णी, जिल्हा उपाध्यक्ष अल्तमश सय्यद, मावळ तालुका उपाध्यक्ष प्रसन्न आंधळे, मावळ तालुका अध्यक्ष सागर सुतार व इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

सर्व समस्याांवर काम होईल अशी ग्वाही तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी. पाटील यांनी दिली. असे निरज कुलकर्णी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष. यांनी आवाज न्यूजला माहिती दिली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!