आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल विद्यालयात विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत..

श्री. डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मध्ये दि.१६/०६/२३ रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे  स्वागत करण्यात आले.

Spread the love

स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल विद्यालयात विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत..Swami Vivekananda English School welcomed the students with joy.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, १६ जुन.

श्री. डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मध्ये दि.१६/०६/२३ रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे  स्वागत करण्यात आले.


शालेय समिती अध्यक्षा.रजनीगंधा खांडगे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे औक्षण करून पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी शालेय मुख्याध्यापिका.शमशाद शेख, पर्यवेक्षिका. रेणू शर्मा, प्राथमिक विभाग प्रमुख.धनश्री पाटील , पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख. तेजस्विनी सरोदे व सर्व शिक्षक वृंद या कार्यक्रमास उपस्थित होते.

सुट्टीनंतर शाळेच्या विश्वात पाऊल टाकताना होणारे अनोखे स्वागत पाहून विद्यार्थी भारावून गेले . सुंदर रांगोळ्या, फुलांची तोरणे , फुगे व पताका अशी आकर्षक सजावट करण्यात आली. ‘फुलपाखरांचे इंद्रधनुष्य’ हा सेल्फी पॉईंट मुलांच्या आकर्षणाचे केंद्र बनले.नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांच्या मनातील भीती स्वागताने नाहीशी झाली. खूप दिवसांनी भेटलेल्या मित्र-मैत्रिणींना पाहून विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. शाळेचा परिसर हर्ष उल्हासाने भरुन गेला होता.नवीन शैक्षणिक वर्षांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत करत असतानाच विद्यार्थी आनंददायी शिक्षण घेऊन यश संपादन करतील अशी आशा शालेय मुख्याध्यापिका.शमशाद शेख यांनी व्यक्त केली.

या स्तुत्य उपक्रमाचे श्री.डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष.संतोष खांडगे , रजनीगंधा खांडगे ,उपाध्यक्ष.दादासाहेब उ-र्हे ,सचिव.मिलिंद शेलार ,कार्याध्यक्ष.बाळासाहेब शिंदे आदींनी कौतुक केले.ज्ञान संपादन करून शाळेचे,कुटुंबाचे नाव उज्ज्वल करावे असा संदेश देऊन शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!