अध्यात्मिकआपला जिल्हामहाराष्ट्र

मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाच्या प्रवक्तेपदी ह.भ.प. सुनिल महाराज वरघडे ; तर संघटकपदी ह.भ.प. गोपिचंद महाराज कचरे…!

Spread the love

मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाच्या प्रवक्तेपदी ह.भ.प. सुनिल महाराज वरघडे ; तर संघटकपदी ह.भ.प. गोपिचंद महाराज कचरे…!

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा प्रतिनिधी १६ जुन.

मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाच्या प्रवक्तेपदी ह.भ.प. सुनिल महाराज वरघडे ; तर संघटकपदी ह.भ.प. गोपिचंद महाराज कचरे यांची नुकतीच निवड करण्यात आली. आरोग्य सेवा समिती अध्यक्षपदी ह.भ.प.राजाराम असवले यांची निवड झाली. आसवले यांचे घरी ही बैठक सर्व पदाधिकारी , सदस्य यांचे उपस्थितीमधे मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाची मासिक बैठक मंडळाचे आरोग्य सेवा  समितीचे अध्यक्ष ह.भ.प. राजाराम असवले यांच्या निवासस्थानी टाकवे बुद्रुक येथे नुकतीच पार पडली.

आषाढी वारीचे निमित्ताने वारकरी बांधवांना मंडळाच्या वतीने दरवर्षी आरोग्य सेवा, औषधोपचार व रूग्णवाहिकेची सेवा आदि सेवा विनामूल्य पुरवल्या जातात. त्यासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली.यावेळी मंडळाचे संघटन संपूर्ण मावळ तालुक्यात अधिक बळकट व्हावे आणि मंडळाचे कार्य घराघरात पोहोचावे यासाठी आषाढी वारीच्या पूर्वसंधेला काही नियुक्त्या करण्यात आल्या. मंडळाच्या प्रवक्तेपदी मावळ तालुक्यातील सुप्रसिद्ध गोसेवक, प्रवचनकार  ह.भ.प. सुनिल महाराज वरघडे यांची नियुक्ती करण्यात आली.मंडळाच्या संघटकपदी युवा प्रवचनकार, तरूणांचे मार्गदर्शक, ह.भ.प. प्रा. गोपिचंदजी महाराज कचरे यांची नियुक्ती करण्यात आली.

या दोन्ही मान्यवरांचा सन्मान यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. नंदकुमार महाराज भसे, कार्याध्यक्ष ह.भ.प. संतोषजी कुंभार, सचिव रामदास पडवळ, ह.भ.प. राजाराम असवले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.मंडळाचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष व सचिव यांनी यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देवून अभिनंदन केले. ह.भ.प. गोपिचंद महाराज कचरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मंडळाने आजवर राबविलेल्या अनेक उपक्रमांचे कौतुक केले व मंडळाचे संघटन वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगितले.

या बैठकीसाठी मंडळाचे उपाध्यक्ष दिलीपजी वावरे, जेष्ठ वारकरी ह.भ.प. महादुबुवा नवघणे, आरोग्यदूत ह.भ.प. योगेशजी गवळी, सहसचिव नितीन आडिवळे सर, आंदर मावळ विभागीय अध्यक्ष दिपक रावजी वारिंगे, कायदेशीर सल्लागार सागर एकनाथ शेटे, विभाग प्रमुख सुखदेव गवारी आदी वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!