आपला जिल्हाआरोग्य व शिक्षण

सरस्वती विद्यामंदिर मध्ये उत्साहात प्रवेशोत्सव साजरा.

Spread the love

सरस्वती विद्यामंदिर मध्ये उत्साहात प्रवेशोत्सव साजरा Entering the Saraswati Vidyamandir is celebrated with enthusiasm.

आवाज न्यूज:तळेगाव दाभाडे वार्ताहर, १६ जुन.

सरस्वती विद्या मंदिर तळेगाव दाभाडे येथील माध्यमिक विभागात इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांचे दिनांक १५ जून  रोजी नवीन शैक्षणिक वर्ष२३- २४ च्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव अंतर्गत उत्साहाने स्वागत करण्यात आले.

वर्गशिक्षिका अरुंधती देशमाने यांनी विद्यार्थ्यांचे औक्षण केले .मुख्याध्यापिका रेखा परदेशी यांनी मुलांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या .पर्यवेक्षिका सुरेखा रासकर व अन्य शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक व पेन याचे वितरण केले. सरस्वती शिक्षण संस्थेच्या सर्व सन्माननीय पदाधिकारी यांनी व माध्यमिक विभागाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.विद्यार्थ्यांना गोड खाऊ देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!