आपला जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

सकल हिंदू समाज आयोजित लोहगड मुक्ती संग्रामास सुमारे हजारो बांधवांची हजेरी..

पोलिसांकडून तगडा बंदोबस्त तैनात...

Spread the love

सकल हिंदू समाज आयोजित लोहगड मुक्ती संग्रामास सुमारे हजारो बांधवांची हजेरी:पोलिसांकडून तगडा बंदोबस्त.About thousands of brothers attended Lohgad liberation struggle organized by Sakal Hindu Samaj: Heavy security by police.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी १९ जुन.

सकल हिंदू समाज आयोजित लोहगड मुक्ती संग्रामास सुमारे सातशे ते हजार बांधवांनी हजेरी लावून भाजे गावात शक्ती प्रदर्शन केले. यावेळी लोणावळा उपविभागीय पोलिसआधिकारी आयपीएस अधिकारी ,सहाय्यक पोलिस आधिक्षक सत्यसाई कार्तिक स्वतः जातीने येथे उपस्थित होते. यावेळी दुधिवरेखिंड येथून  गडावर जाणारे  सर्व रस्ते पर्यटकांसाठी बंद करण्यासाठी सुमारे शंभर पोलिसआधिकारी उपस्थित होते.

एलसीबी , वडगाव , कामशेत , लोणावळा शहर व लोणावळा ग्रामिणचे पोलिस येथे मोठ्या पोलिस बंदोबस्तात उपस्थित होते.यावेळी हिंदु बांधवांतर्फे पूर्ण विचारांती योग्य ती कारवाई करण्यासाठी छञपती शिवाजी महाराजांच्या बुद्धीमत्ता चातुर्याचा अभ्यास करून त्यांनी अफजलखानाचा व शाहिस्तेखानाचा पराभव केला.त्याप्रमाणेच सर्व हिंदुबांधवांनी पूर्णपणे नियोजन पूर्वक लोहगड मुक्तीसंग्राम करण्यासाठी सर्वांनी कटिबध्द राहावे, असे अवाहन यावेळी करण्यात आले होते.

यावेळी मावळचे नायब तहसिलदार.आवटी यांना व पोलिस उपविभागीय कार्यालयाचे आयपीएस आधिकारी सत्यसाई कार्तिक यांना निवेदनाची प्रत देण्यात आली.

यावेळी छञपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार घालून या आंदोलनास प्रारंभ झाला..यावेळी भगवे झेंडे हातात व डोक्यावर भगवी टोपी तसेच गळ्यात भगवे उपरणे असा वेष परिधान करून शेकडो हिंदु बंधु भगिनी यांनी उपस्थिती लावली होती.सुमारे साडेबारा ते एक दरम्यान आःदोलन समाप्त झाल्यावर सर्वांना घरी जाण्याबाबत सूचित करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!