कृषीवार्तामहाराष्ट्र

शेतकऱ्यांनी मॅग्नेट प्रकल्पाचा लाभ घ्यावा डॉ. सुभाष घुले.

कृषी विज्ञान केंद्र तळसंदे येथे कार्यशाळा आयोजित शेतकरी उत्पादक कंपन्यांनी मॅग्नेट प्रकल्पाचा लाभ घ्यावा.

Spread the love

शेतकऱ्यांनी मॅग्नेट प्रकल्पाचा लाभ घ्यावा डॉ. सुभाष घुले.Farmers should take advantage of magnet project. Subhash Ghule.

आवाज न्यूज : वार्ताहर, १८ जुन.

कृषी विज्ञान केंद्र तळसंदे येथे कार्यशाळा आयोजित
शेतकरी उत्पादक कंपन्यांनी मॅग्नेट प्रकल्पाचा लाभ घ्यावा व त्यातील विविध योजनेत मधून केळी पिकातील प्रक्रिया उद्योग विपणन व मूल्यवर्धन करून त्याला योग्य तो भाव मिळावा यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, कोल्हापूरचे उपसरव्यवस्थापक तथा मॅग्नेट प्रकल्पाचे विभागीय प्रकल्प उपसंचालक प्रकल्प, कोल्हापूर डॉ. सुभाष घुले, यांनी सहकार व पणन विभाग, महाराष्ट्र शासन व आशियाई विकास बँक अर्थसहाय्यीत महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क मॅग्नेट प्रकल्प अंतर्गत डी. वाय.पाटील एज्युकेशन सोसायटीचे, कृषी विज्ञान केंद्र, तळसंदे येथे आयोजित केळी उत्तम कृषी पद्धती बाबत कार्यशाळा च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी त्यांनी केळीमधील जी.आय मानांकन व मॅग्नेट प्रकल्प मार्फत शेतकरी उत्पादक कंपनी तसेच शेतकऱ्यांना एकत्रित येऊन लाभ घ्यावा. केळीतील विविध जाती, लागवडीचे योग्य पद्धती पाणी व्यवस्थापन बद्दल सुरेश मगदूम, वरिष्ठ कृषीशास्त्रज्ञ, जैन इरिगेशन लि. जळगाव यांनी मार्गदर्शन केले.

केळीतील एकात्मिक खत व्यवस्थापन याबद्दल सविस्तर माहिती कृषी विज्ञान केंद्र, तळसंदे चे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख  जयवंत जगताप व केळीमधील कीड रोग व्यवस्थापन बद्दल  मधुकर माळी, विषय विशेषज्ञ, पिक संरक्षण कृषी विज्ञान केंद्र तळसंदे यांनी यांनी केले. माती परीक्षणाचे महत्व व माती आरोग्य व्यवस्थापन बद्दल सविस्तर माहिती डॉ. निनाद वाघ, कार्यक्रम सहाय्यक मृदा शास्त्र विभाग कृषी विज्ञान केंद्र तळसंदे तसेच केळी पिकातील प्रक्रिया उद्योग विपणन त्याचबरोबर केळी पिकवण्याच्या पद्धती याबद्दल  दिपाली मस्के, विषय विशेषज्ञ, गृहविज्ञान विभाग कृषी विज्ञान केंद्र, तळसंदे यांनी केले. कार्यशाळेसाठी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील १८० हुन अधिक शेतकऱ्यांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  सुधीर सूर्यगंध यांनी केली व  राजवर्धन सावंत भोसले यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!