आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

सरस्वती शाळेत जागतिक योगा दिन व जागतिक संगीत दिन उत्साहात साजरा..

Spread the love

सरस्वती शाळेत जागतिक योगा दिन व जागतिक संगीत दिन उत्साहात साजरा..World Yoga Day and World Music Day celebrated with enthusiasm in Saraswati School..

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी २२ जुन.

बुधवार दिनांक 21 जून रोजी सरस्वती विद्यामंदिर माध्यमिक विभागात जागतिक योगा दिनानिमित्त मुख्याध्यापिका सौ रेखा परदेशी यांनी योगाचे महत्त्व सांगितले तर जागतिक संगीत दिनानिमित्त सौ कल्याणी जोशी यांनी संगीता विषयीची माहिती व हा दिन का साजरा करतात याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली .

दोन्ही दिनांचे औचित्य साधून  सुनीता कुलकर्णी बाई यांनी योगासनावर एक गीत सादर केले .क्रीडाशिक्षक  संजय गायकवाड यांनी विद्यार्थी व शिक्षकांकडून योगासने करून घेतली. यामध्ये प्रामुख्याने वृक्षासन ,ताडासन, ओंकार ,कपालभाती, भुजंग प्राणायाम ,अनुलोम विलोम, भ्रामरी प्राणायाम… इत्यादी आसने करून घेतली .आपल्या प्रास्ताविकात मुख्याध्यापिका रेखा परदेशी यांनी सांगितले की फक्त २१ जून रोजीच योगा दिनानिमित्त योगासन न करता आपल्या स्वास्थ्यासाठी आपण दररोज किमान दहा मिनिटं योगासने करणे आवश्यक आहे.

 

 

त्याचप्रमाणे आपल्याला आवडेल ते संगीत देखील ऐकणे तितकेच गरजेचे आहे. आज इयत्ता नववीची पालक सभा असल्याने पालकांनी देखील योग दिनानिमित्त प्राणायाम केले .संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी यांनी योग दिनानिमित्त सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!