आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजन

प्रतिभा इन्स्टिट्युट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट व प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड कॉम्प्युटर स्टडीजमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन विविध कार्यक्रमांनी साजरा..

Spread the love

प्रतिभा इन्स्टिट्युट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट व प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड कॉम्प्युटर स्टडीजमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन विविध कार्यक्रमांनी साजरा.Pratibha Institute of Business Management and Pratibha College of Commerce and Computer Studies celebrated International Yoga Day with various programs.

आवाज न्यूज : गुलाम अली भालदार, २१ जुन.

चिंचवड येथील कमला शिक्षण संकूल संचलित प्रतिभा इन्स्टिट्युट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट व प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड कॉम्प्युटर स्टडीजमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला, यात राष्ट्रीय सेवा दल, एम.बी.ए., एम.सी.ए.चे विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना योग प्रशिक्षण व मार्गदर्शन तज्ञाकरवी करून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला.

यावेळी संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, प्रभारी प्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, एम.बी.ए. विभागाचे संचालक डॉ. सचिन बोरगावे, मुख्य प्रशासकिय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरीया यांच्या उपस्थितीत योग प्रशिक्षक सुप्रिया बलकवडे, धनेश पराडकर यांनी एम.बी.ए. व एम.सी.ए. च्या विद्यार्थ्यांना तर, राष्ट्रीय सेवा योजनाच्या विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना आर्या गोसावी, विभाग प्रमुख डॉ. रुपा शहा यांनी प्रशिक्षण व मार्गदर्शन करून योगसाधनेचे महत्त्व विषद केले. त्याला उपस्थितांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावना शारीरिक शिक्षण संचालक, डॉ. आनंद लुंकड, प्रा. पांडुरंग इंगळे व एम.बी.ए. विभागाचे संचालक डॉ. सचिन बोरगावे यांनी उपस्थित योग प्रशिक्षक शिक्षकांचे सत्कार केले. तर, संयोजन प्रा. कविता दिवेकर, डॉ. महिमा सिंग, प्रा. अश्लेषा देवळे, प्रा. वर्षा ठाकरे, रविंद्र पबशेटेवार यांनी केले. आभार प्रा. सुकलाल कुंभार यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!