आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनसामाजिक

आपले शरीर म्हणजे एक वाद्य आहे..त्याची जोपासना योगा द्वारे करू” …संपदा थिटे..

कलापिनीचा आगळा वेगळा जागतिक योग दिन आणि संगीत दिन संपन्न..

Spread the love

आपले शरीर म्हणजे एक वाद्य आहे..त्याची जोपासना योगा द्वारे करू” …संपदा थिटे..
कलापिनीचा आगळा वेगळा जागतिक योग दिन आणि संगीत दिन संपन्न..”Our body is an instrument.. cultivate it through yoga” …Sampada Thete..Kalapini’s next different World Yoga Day and Music Day..

आवाज न्यूज :  तळेगाव दाभाडे वार्ताहर, २२ जुन.

” आपले शरीर म्हणजे एक वाद्य आहे.त्यातून अनेक सुर निघू शकतात..त्याचा आवाज आपण ऐकला पाहिजे,पण ते ओळखणे,त्याचा योग्य पद्धतीने उपयोग करून घेणे हे महत्त्वाचे आहे” असे प्रसिद्ध गायिका व संगीत अभ्यासिका सौ.संपदा थिटे यांनी कलापिनी संस्थेच्या जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या कार्यक्रमात सांगितले.जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या कार्यक्रमा ची सुरवात प्रख्यात गायिका संपदा थिटे आणि योगशिक्षिका सुप्रिया जोशी यांच्या हस्ते नटराज पूजन करून करण्यात आली.

यावेळी त्यांच्या बरोबर श्री.चैतन्य जोशी हे योगासनांची प्रात्यक्षिके दाखविण्यासाठी उपस्थित होते.सौ.प्रिया जोशी यांनी अष्टांग योग,प्राणायाम,विविध योगासने यांची माहिती दिली आणि प्रात्यक्षिक करून घेतले.
जागतिक संगीत दिनाचे औचित्य साधून तळेगावातील लोकप्रिय गायिका व योगाभ्यासाची आवड असणाऱ्या संपदा थिटे यांनी संगीत आणि योग यांचा उत्तम मेळ साधत ओंकाराचे महत्व विशद करून उच्चारण कसे असावे ते शिकवले. सगळ्यांनी त्याचा अनुभव घेतला आणि अतिशय चैतन्यपूर्ण वातावरण निर्माण झाले. नंतर योगशिक्षिका असलेल्या प्रिया जोशी यांनी वेगवेगळ्या प्रकाराने प्राणायाम करून घेतले. प्राणायामाचे महत्त्व, अष्टांग योग याची अतिशय सुंदर शैलीमध्ये माहिती करून दिली. बैठक आणि शयन स्थितीतील व्यायाम, आसने करून घेतली.चैतन्य जोशी यांनी योगासनांची प्रात्यक्षिके करून दाखवली.

 

अंजली सहस्रबुद्धे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय आणि सत्कार केला. कलापिनीचे विश्वस्त डॉ.अनंत परांजपे यांनी हास्य योगाचे प्रकार सगळ्यांकडून करून घेऊन समारोप केला या प्रसंगी मावळ न्यूज पोर्टल लोणावळा चे  संजय पाटील हे सुध्दा योगासनात सहभागी झाले होते.
या कार्यक्रमासाठी रवींद्र पांढरे, रश्मी पांढरे, संपदा नातू, दीप्ती आठवले, दिपाली जोशी  देशमुख यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!