आपला जिल्हाकृषीवार्तासामाजिक

तळेगांव दाभाडे शहराची शान असलेला रविवार आठवडे बाजार हा रोजच्या जागेतच भरणार.एन. के. पाटील मुख्याधिकारी त.दा.न.प.

व्यापारी वर्गाने सुचविलेले सर्व विषय समजून घेतल्यावर मुख्याधिकारी साहेबांनी,रविवार आठवडे बाजाराची जागा आहे त्या जुन्या जागेवरच योग्य आहे म्हणून इतर सर्व उपाय योजना करण्यासाठी पालिका अधिकारी वर्गाला व पोलीस प्रशासनास तसे आदेश दिले.

Spread the love

तळेगांव दाभाडे शहराची शान असलेला रविवार आठवडे बाजार हा रोजच्या जागेतच भरणार.एन. के. पाटील मुख्याधिकारी त.दा.न.प.

Talegaon Dabhade city’s pride of Sunday weekly market will be filled in everyday space.

आवाज न्यूज :  तळेगाव दाभाडे वार्ताहर, २२ जुन.

मुख्याधिकारी पाटील साहेबांनी, रविवार आठवडे बाजारा संबंधी उपाय योजना करण्यासाठी शहरातील व्यापारी वर्गाला निमंत्रित केले होते.साधक बाधक चर्चा करण्यात आली,
मा.शिक्षण मंडळ सभापती – नगरसेवक व्यापारी  प्रकाश  ओसवाल ह्यांनी सत्य परिस्थिती काय आहे हे co साहेबांना पटवून दिले.

शहराध्यक्ष  रवींद्र माने,सामाजिक कार्यकर्ते  सचिन जाधव , सतीश राऊत,नगरसेवक  अमोल शेटे ,नगरसेवक अरुण माने
ह्यांनी व्यापारी वर्गाची बाजू मांडून मनोगत व्यक्त केले,
आणखी बऱ्याच व्यापारी वर्गाने आप आपल्या सूचना मांडून पालिकेचा दर वेळेस व्यापारी वर्गाला वेठीस धरण्याचा हा विषय कायमचा हाणून पाडला.

व्यापारी वर्गाने सुचविलेले सर्व विषय समजून घेतल्यावर मुख्याधिकारी साहेबांनी,रविवार आठवडे बाजाराची जागा आहे त्या जुन्या जागेवरच योग्य आहे म्हणून इतर सर्व उपाय योजना करण्यासाठी पालिका अधिकारी वर्गाला व पोलीस प्रशासनास तसे आदेश दिले.सदर मीटिंगला
ॲड रवींद्र दाभाडे,राकेश ओसवाल,विनोद राठोड,भवरमल संघवी,शांतीलाल ओसवाल,दिनेश देवासी,चेतन ओसवाल,अनेकर,ढोले, अर्चनाताई खोंड, सुभाष राठोड, केयुर् शहा, उनकुले,परदेशी, दादा गोरे,जव्हेरी ,कसाबी, बाळा बोराडे ,असे जवळ जवळ ४०-५० व्यापारी वर्ग व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्वांचे आभार  निर्मल ओसवाल यांनी मानले ,
सर्व व्यापारी वर्गा तर्फे मुख्याधिकारी साहेबांनी रविवार आठवडे बाजार आहे त्या जागेतच भरला जावा व इतर कोठेही हालविला जाऊ नये असे निवेदन देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!