ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यात आता ९ नवीन आरटीओ; नवीन आरटीओंमध्ये पिंपरी-चिंचवडचा समावेश.

Spread the love

राज्यात आता ९ नवीन आरटीओ; नवीन आरटीओंमध्ये पिंपरी-चिंचवडचा समावेश.Now 9 new RTOs in the state; Inclusion of Pimpri-Chinchwad in new RTO. 

आवाज न्यूज : चिंचवड प्रतिनिधी, २४ जुन.

राज्य सरकारने नऊ नवीन प्रादेशिक परिवहन कार्यालयांची (आरटीओ) निर्मिती केली आहे. यासाठी राज्यातील नऊ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांचे रुपांतर आरटीओमध्ये करण्याचा आदेश गृह विभागाने शुक्रवारी काढला. नवीन आरटीओंमध्ये पिंपरी-चिंचवड, सातारा, बोरीवली, अहमदनगरचा समावेश आहे.

राज्यातील एकूण नऊ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांचे रूपांतर आरटीओमध्ये करण्यात आले. त्यात पिंपरी-चिंचवड, जळगाव, सोलापूर, अहमदनगर, वसई (जि.पालघर), चंद्रपूर, अकोला, बोरीवली आणि सातारा यांचा समावेश आहे. यामुळे काही आरटीओंच्या अंतर्गत असलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्येही बदल झालेला आहे. पुणे आरटीओत आता बारामती उपप्रादेशिक कार्यालय असेल. पुण्याच्या अंतर्गत असलेले पिंपरी-चिंचवड आणि सोलापूर हे आता वेगळे आरटीओ असतील. सोलापूर अंतर्गत अकलूज उपप्रादेशिक कार्यालय असेल. याचप्रमाणे इतर आरटीओंमधीलही रचना बदलण्यात आली आहे.

पदोन्नतीचा मार्ग खुला,राज्य सरकारने परिवहन कार्यालयाच्या अखत्यारीतील सुधारित आकृतीबंधासही मान्यता दिलेली आहे. यामुळे मागील काही काळापासून परिवहन विभागातील रखडलेल्या पदोन्नतीचा मार्ग खुला झाला आहे. त्यामुळे पदोन्नतीसाठी प्रतीक्षेत असलेल्या उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची आता प्रादेशिक परिवहन अधिकारी होतील.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!