आपला जिल्हाआरोग्य व शिक्षण

सरस्वती शिक्षण संस्थेचा दहावी गुणगौरव व पाचवी शब्दकोश वितरण समारंभ उत्साहात साजरा..

सरस्वती शिक्षण संस्थेतर्फे शालांत परीक्षा मार्च२०२३ मध्ये शाळेत प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण विद्यार्थी त्याचप्रमाणे ९०% च्या वर गुण घेणारे विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न.

Spread the love

सरस्वती शिक्षण संस्थेचा दहावी गुणगौरव व पाचवी शब्दकोश वितरण समारंभ उत्साहात साजरा..Saraswati Education Institute’s 10th graduation and 5th dictionary distribution ceremony celebrated with enthusiasm.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २४ जुन.

शनिवार दिनांक २४ जून  रोजी सरस्वती शिक्षण संस्थेतर्फे शालांत परीक्षा मार्च२०२३ मध्ये शाळेत प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण विद्यार्थी त्याचप्रमाणे ९०% च्या वर गुण घेणारे विद्यार्थी , विषयात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांचा ,संस्थेत कार्यरत असणाऱ्या शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांच्या पाल्यांचा सत्कार समारंभ व डॉक्टर हेडगेवार यांच्या पुण्यतिथी निमित्त इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना शब्दकोश वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

संस्थेचे अध्यक्ष. सुरेश झेंड, उपाध्यक्ष  दिलीप कुलकर्णी, खजिनदार. सुचित्राताई चौधरी, शिक्षण मंडळ सदस्य डॉक्टर ज्योतीताई चोळकर, सदस्य  विश्वास देशपांडे , प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक.  नवनाथ गाढवे, बालवाडी विभाग प्रमुख. सोनाली काशिद, इंदोरी बालवाडी विभाग प्रमुख. अनुराधा बेळणेकर,माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका रेखा परदेशी या कार्यक्रमास उपस्थित होते.

 

प्रथम तीन क्रमांक आलेले विद्यार्थी कुमारी संपदा देशपांडे, धवल पुराणिक ,अनुजा ठुबे या विद्यार्थ्यांच्या हस्ते व इयत्ता नववी त प्रथम तीन क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका. रेखा परदेशी यांनी केले.त्यात त्यांनी दहावीच्या शालांत परीक्षेच्या निकालाचा आढावा घेतला. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना प्रतिनिधिक स्वरूपात संस्कृत- मराठी- इंग्रजी हा शब्दकोश देण्यात आला, यावेळी विद्यार्थ्यांचे नावाचे वाचन  शोभा जाधव यांनी केले.सूत्र संचालन  सुनीता कुलकर्णी यांनी केले. देणगीदार पुरस्कृत पारितोषिकाचे वाचन माध्यमिक विभागाच्या पर्यवेक्षिका  सुरेखा रासकर व छाया सांगळे यांनी केले .यावेळी संस्थेत कार्यरत असलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे दहावी व बारावीला उत्तीर्ण झालेल्या पाल्यांचा देखील सत्कार करण्यात आला. त्याचे वाचन संजय गायकवाड यांनी केले .संपदा देशपांडे व अनुजा ठुबे या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले व त्यातून विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळवण्याचा संदेश दिला .आपल्या मनोगतात अध्यक्ष  सुरेश झेंड यांनी सांगितले की विद्यार्थ्यांनी बौद्धिक गुणांबरोबरच इतरही गुणांचा विकास करावा तर उपाध्यक्ष दिलीप कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना अशीच गुणवत्ता यापुढेही कायम ठेवा व शाळेत कधीही या आपले स्वागतच आहे असा सल्ला दिला.संस्थेचे सदस्य  विश्वास देशपांडे यांनी आभार मानले.

ज्या प्रमाणे देणगीदारांनी तुमच्या यशाचे कौतुक म्हणून तुम्हाला पारितोषिक दिले आहे, त्याची जाणीव ठेवून जेव्हा तुम्ही सक्षम नागरिक व्हाल तेव्हा तुम्हीही इतरांना असेच प्रोत्साहन देऊन मदत करा असा सल्ला दिला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!