आपला जिल्हाकृषीवार्तामहाराष्ट्र

लोणावळ्यात पावसाची दमदार हजेरी कालअखेर २५३ मी मी पाऊस;काल ८५ मी.मी.पावसाची नोंद.

Spread the love

लोणावळ्यात पावसाची दमदार हजेरी कालअखेर २५३ मी मी पाऊस;काल ८५ मी.मी.पावसाची नोंद.Heavy rainfall in Lonavala 253 mm of rain by the end of yesterday; 85 mm of rain recorded yesterday.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा प्रतिनिधी, २६ जुन.

लोणावळ्यात पावसाने दमदार हजेरी लावली. ता.२४ रोजी दुपारी सुरू झालेल्या पावसामुळे कालअखेर पर्यत २५३ मी.मी.पाऊस झाला. गतवर्षी काल अखेर ९९मी मी पाऊस पडला होता.चालू वर्षी ;काल ८५ मी.मी.पावसाची नोंद झाल्याचे लोणावळा नगरपरिषद ग्रंथालय व मोफत वाचनालयातर्फे नोंदविण्यात आले आहे.

पाऊस न पडल्याने खरीपाच्या पेरण्या करण्यासाठी शेतकरी आभाळाकडे पहात होता. काहींनी धूळवाफेवर केलेल्या पेरण्यां वाया जातात की काय असे वाटत होते.पण पेरण्या केलेल्या शेतात रोपे उगवूनही ती पिवळी पडण्याची भीती होती.आता पाऊस सक्रीय झाल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. पाऊस सुरू झाल्याने पंढरीच्या वारीला जाणारा व गेलेला शेतकरी निश्चिंत झाला.

पर्यटकांची गर्दी वाढली, कार्ला गडावर भाविकांकडून गर्दीचा उच्चांक, लोणावळा , मळवली , कार्ला परिसरात दमदार पाऊस झाल्याने हवेतील उष्णता कमी होऊन गारवा निर्माण झाला.या पावसामुळे मळवली ला रेल्वेने वा खाजगी वाहनांनी येणारे पर्यटकांची संख्या वाढली.लोहगड , विसापूर किल्ले , भाजेलेणी येथे पर्यटकांची गर्दी झाली होती.

श्रीएकविरा देवी मंदीरात भाविकांकडून दर्शनासाठी रांगा लागल्या लोहगडाचे पायथ्याशी व गडावर शनिवार व रविवारी पाऊस पडल्याने प्रचंड गर्दी होती. वेहेरगावचे मध्यवर्ती भागापासून कार्ला फाटा रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी दिसून आली.पार्कींगची योग्य ते नियोजन नसल्याने व मोठ्या लक्झरी बसेसही गावात येत असल्याने वाहतूक कोंडीत अधिकच भर पडलेली दिसत होती.यावर स्थानिक दुकानदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.वनव्यवस्थापन समिती पार्कींग चार्जैस घेते , पण नीट व्यवस्था करत नसल्याने वाहनचालकांचे मोठे हाल होताना दिसून आले.

लोणावळा शहरातून भुशीगाव , भुशीडॕम कडे जाणाऱ्या मार्गावरही गर्दी होती.डोंगररांगा हिरवाईने नटून पर्यटकांची येथे गर्दी होत असल्याने स्थानिक दुकानदारांनी , टपरीधारकां कडून डागडुजी तयारी सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!