आपला जिल्हाआरोग्य व शिक्षण

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने घेतले शैक्षणिक पालकत्व.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पुणे जिल्हा तर्फे रविवार दि. २५ जून २०२३ रोजी शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रम करण्यात आला. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे हे सलग तिसरे वर्ष आहे.

Spread the love

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने घेतले शैक्षणिक पालकत्व.All India Brahmin Federation took the educational guardianship.

आवाज न्यूज : पुणे प्रतिनिधी, २६ जुन.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पुणे जिल्हा तर्फे रविवार दि. २५ जून २०२३ रोजी शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रम करण्यात आला. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे हे सलग तिसरे वर्ष आहे.घरची अत्यंत गरिबी, काहींच्या घरातील कर्त्या कमावत्या पुरुषाचे झालेले निधन, कोरोना काळात गेलेली नौकरी, हातावरचे पोट अशा प्रतिकूल परिस्थितीत जगत असलेले खडतर आयुष्य, परंतु शिकण्याची जिद्द, जबाबदारी ची जाणीव, आपल्या कुटुंबासाठी काहीतरी करण्याची सचोटीची भावना अशा समाजातील गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांची २०२३ सालची शाळा, कॉलेज ची शैक्षणिक फी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या मार्फत भरण्यात आली. शिक्षणासाठी व त्यांच्या गुणवत्तेला दाद म्हणुन एक खारीचा वाटा महासंघ ही शिष्यवृत्तीरुपात देत असतो.

कर्वेनगर येथे झालेल्या ह्या शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून IT व्यवसायातील तज्ज्ञ,अग्रगण्य नाव डॉ. दीपक शिकारपूर हे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील संधी, विशेषतः जपानी भाषा शिकण्याचे फायदे व त्याद्वारे जपान मध्ये मिळणारी परदेशी नौकरी. या विषयावर मार्गदेशन केले व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.कठीण प्रसंगी, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने केलेल्या बहुमूल्य मदतीमुळे, पालकांचे डोळे अक्षरशः पाणावले व सर्वांनी केलेल्या मदतीबद्दल महासंघाचे आभार मानले व आश्वासन दिले की शिक्षण पूर्ण झाल्यावर, उत्तम नौकरी लागल्यावर समाजातील उपेक्षित व हुशार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व घेऊ.

मुलांचा, पालकांचा व प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद हे या कार्यक्रमांचे यश म्हणता येईल.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुणे जिल्हा अध्यक्ष. मंदार रेडे यांनी केले. ऋचा पाठक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी केतकी कुलकर्णी,  कमलेश जोशी,  राहुल जोशी,  अमोघ पाठक यांचा सहभाग होता. या कार्यक्रमाला विजय शेकदार, डॉ.प्रशांत मंझिरे,विश्राम देव, सरस्वती जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!