अध्यात्मिकआपला जिल्हाआरोग्य व शिक्षणसामाजिक

झाहला हरिनामाचा गजर.

कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी..

Spread the love

झाहला हरिनामाचा गजर.
कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी..Jahla Harinama’s alarm.Krishnarao Bhegade English Medium School celebrated Ashadhi Ekadashi with enthusiasm.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २९ जुन.

कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आषाढी एकादशीचा सोहळा उत्साहात साजरा झाला. यावेळी संस्थेचे संस्थापक. चंद्रकांत काकडे, मंगलाताई काकडे, खजिनदार गौरी काकडे, सचिव. राजश्री म्हस्के,  राजश्री शहा तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका. मीना अय्यर उपस्थित होत्या.

मान्यवरांच्या हस्ते प्रथम विठ्ठल रुखमाईच्या पालखीचे पूजन करण्यात आले. यावेळी. गौरी काकडे यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, ‘ विद्यार्थ्यानी अभ्यासाबरोबर आपल्या आराध्य देवतेचे नामः स्मरण करून ऊर्जा मिळवावी’ तसेच आषाढी वारीचे महत्त्व पटवून देताना शाळेच्या मुख्याध्यापिका. मीना अय्यर म्हणाल्या, ‘ आषाढी वारी ही आपली संस्कृती आहे, देवाचे नाम स्मरण हे आपल्याला देवाशी जोडते, तसेच सफेद कपडे घालून वारीला जाणे, म्हणजे शांततेचा संदेश आपण देतो. ‘ असे मोलाचे मार्गदर्शन केले.

शिक्षिका. पद्मजा सातव यांनी आपल्या भाषणात आषाढी दिनाचे महत्त्व सांगितले. पारंपरिक वेशभूषेत पखवाज, टाळ, मृदुंगाच्या साथीत सहभागी झालेले विद्यार्थी वारकरी, सावळ्या विठ्ठल रुखमाईचे रूप धारण केलेल्या विद्यार्थ्यांचे रूप पाहण्यासारखे होते. इयत्ता ४थी ते ८वीच्या विद्यार्थ्यानी ‘ कानडा राजा पंढरीचा ‘ हा अभंग सादर केला. तसेच शाळेतील शिक्षकांनी ‘ विठू माउली तू ‘ हे गाणे गाऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विद्यालयाच्या वतीने दिंडी काढण्यात आली. यात कोणी संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर तर कोणी संत मुक्ताबाई झाले होते. विद्यार्थ्यानी हातात भगव्या पताका नाचवत विठुरायाच्या नामाचा व ग्यानबा – तुकारामाचा गजर करत पालखी काढली. सर्व विध्यार्थी व शिक्षकांमध्ये उत्साह होता. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन शिक्षिका. श्रध्दा अल्हाट यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!