आपला जिल्हासामाजिक

ओला उबेर पिंपरी चिंचवड, व पुण्यातुन हद्दपार करा.सुनिल कदम. श्री नागेश्वर महाराज रिक्षा संघ मोशी.

Ola Uber चे रिक्षावाले स्टॅण्डवर येऊन दादागिरी करत नाहक ञास देत आहेत.

Spread the love

ओला उबेर पिंपरी चिंचवड व पुण्यातुन हद्दपार करा.सुनिल कदम. श्री नागेश्वर महाराज रिक्षा संघ मोशी.Deport Ola Uber from Pimpri Chinchwad.Sunil Kadam. Shri Nageshwar Maharaj Rickshaw Sangh Moshi. Ola Uber चे रिक्षावाले स्टॅण्डवर येऊन दादागिरी करत नाहक ञास देत आहेत.

आवाज न्यूज : पिंपरी चिंचवड प्रतिनिधी, २९ जुन.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार पुणे RTO कडे “अग्रिगेटर” परवाना घेण्यासाठी ओला- उबर कंपन्यासह ईतर कंपन्यांनी अर्ज केले होते, मात्र मोटार वाहन कायद्यानुसार आवश्यक त्या निकशांची पूर्तता करत नसल्याच्या कारणांमुळे RTO ने त्यांना हा परवाना नाकारला आहे. त्यामुळे ओला उबर कंपनीला पुण्यामध्ये प्रवासी वाहतूक यापुढे करता येणार नाही. कंपन्यांना “स्टेट ट्रान्सपोर्ट अपिलेट” कडे याबाबत अपील करण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली होती.

विघटनाने सर्व कंपन्यांना शहरातील ऑटोरिक्षा सेवा तात्काळ प्रभावाने चालविण्यास बंदी घातली आहे. पुण्यातील लोक मोबाईलवर आधारित अॅप्लिकेशन वापरून ऑटो बुक करू शकणार नाहीत. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सुमारे 40,000 ते 45,000 ऑटो-रिक्षांचे एग्रीगेटर कंपन्यांशी टाय-अप आहेत.

ओला, उबर, के व्हॅल्युएशन टेक्नॉलॉजीज आणि रॅपिडोसह चार एग्रीगेटर कंपन्यांनी पुण्यात ऑटो सेवा चालवण्यासाठी परवान्यासाठी अर्ज केला होता. ओला आणि उबेरने चारचाकी हलकी मोटार वाहने आणि तीनचाकी ऑटोरिक्षा या दोन्ही श्रेणींसाठी अर्ज केले होते, तर के व्हॅल्युएशन टेक्नॉलॉजीज आणि रॅपिडोने केवळ तीन-चाकी ऑटोरिक्षा सेवांसाठी अर्ज केले होते.यापूर्वी, मुंबई उच्च न्यायालयाने बाइक टॅक्सी कंपनी रॅपिडोला महाराष्ट्रात त्यांची सेवा बंद करण्याचे आदेश दिले होते, त्यानंतर पुणे आरटीओने परवानगी नाकारली.

पोलीस प्रशासन आणि आरटीओ प्रशासन लक्ष देत नाहीये यामुळे आमच्या रिक्षा स्टॅंडवर प्रवाशांसोबत भांडणे होत आहे ,रिक्षावाले आम्हाला शिवीगाळ करतात, आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करतो परंतु त्यामध्ये युपी, बिहारचे रिक्षा चालक ola उबर वर जास्त करून काम करत आहेत व ते रिक्षावाले स्टँडवर येउन दादागिरी करत आहेत अशी माहिती श्री नागेश्वर महाराज रिक्षा संघ मोशी. चे सदस्य. सुनिल कदम यांनी आवाज न्यूजला दिली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!