अध्यात्मिकदेश विदेशसामाजिक

आषाढी एकादशीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे यांनी केली पंढरपूर मंदिरात पूजा.

पहाटेच्या पूजेनंतर मंदिर परिसरात माऊली.माऊलीचा जयघोष..

Spread the love

आषाढी एकादशीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे यांनी केली पंढरपूर मंदिरात पूजा.पहाटेच्या पूजेनंतर मंदिर परिसरात माऊली…माऊलीचा जयघोष On Ashadhi Ekadashi, Maharashtra Chief Minister Shinde performed pooja in Pandharpur temple. After the morning pooja in the temple area, Mauli…Mauli’s chanting.

आवाज न्यूज : पंढरपूर प्रतिनिधी, २९ जुन.

पंढरपुरात भक्तीचा महापूर; पहाटेच्या पूजेनंतर मंदिर परिसरात माऊली…माऊलीचा जयघोष
सोलापूर : विठू नामाच्या जयघोषाने पंढरी नगरी दुमदुमून गेली असून, आषाढीनिमित्त पवित्र स्नानाची पर्वणी साधण्यासाठी चंद्रभागा नदीचा तीर वारकऱ्यांच्या गर्दीने फुलून गेला. पंढरपुरात जणू भक्तीचा महापूर आला आहे. आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेनंतर विठ्ठल मंदिर परिसरात संत तुकाराम महाराज की जय… संत ज्ञानेश्वर महाराज की जय… माऊली माऊली चा जयघोष सुरु झाला.

दरम्यान, पंढरपुरातील मठ, मंदिरे आणि धर्मशाळांमधून विठू नामाचा जयघोष सुरू आहे. टाळ, मृदुंगाच्या गजराने पंढरीचा आसमंत दणाणून गेला आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून बारा लाखाहून अधिक भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. सावळ्या विठुरायाच्या दर्शनाचा आस लागलेल्या भाविकांच्या चेहऱ्यावर दर्शन घेताना आनंद ओसंडून वाहत आहे.

पंढरपुरात आज आषाढी एकादशीमुळे भक्तिमय वातावरण आहे. पंढरपुरातील सर्व रस्ते वारकऱ्यांनी फुलून गेले आहेत. पददर्शन व मुखदर्शनासाठी हजारो वारकरी रांगेत उभे आहेत. दर्शनासाठी एका भाविकाला अठरा ते वीस तास लागत आहेत. पंढरपूरात आज भक्तीचा मळा फुलला आहे.

आषाढी एकादशीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे यांनी केली पंढरपूर मंदिरात पूजा, चांगल्या पावसासाठी प्रार्थना पूजाअर्चा केल्यानंतर मंदिरात सभेला संबोधित करताना शिंदे म्हणाले, मंदिर परिसराच्या विकासासाठी ७३ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले असून आराखडा तयार करताना सर्वांना विश्वासात घेतले जाईल.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी ‘आषाढी एकादशी’ निमित्त सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर शहरातील मंदिरात भगवान विठ्ठल आणि देवी रुक्मिणी यांची महापूजा केली.

मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पत्नी लता शिंदे, खासदार पुत्र श्रीकांत शिंदे आणि कुटुंबातील इतर सदस्यांसमवेत चांगला मान्सून आणि शेतकऱ्यांच्या समृद्धी आणि आनंदासाठी प्रार्थना केली.अहमदनगरमधील नेवासा येथील रहिवासी भाऊसाहेब काळे आणि मंगल काळे या वारकरी दाम्पत्याला गुरुवारी पहाटे मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमवेत धार्मिक विधी करण्याची संधी मिळाली.

“राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. या वर्षी राज्यात पाऊस समाधानकारक व्हावा आणि शेतकरी सुखी आणि समृद्ध व्हावा, अशी  भगवान विठ्ठलाकडे प्रार्थना केली,” असे शिंदे यांनी नंतर ट्विटमध्ये म्हटले आहे.

पूजाअर्चा केल्यानंतर मंदिरात सभेला संबोधित करताना शिंदे म्हणाले, मंदिर परिसराच्या विकासासाठी ७३ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले असून आराखडा तयार करताना सर्वांना विश्वासात घेतले जाईल.प्रदीर्घ परंपरा म्हणून, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दरवर्षी ‘आषाढी एकादशी’ला पंढरपूर येथील विठ्ठलाला समर्पित प्रसिद्ध मंदिरात प्रार्थना करतात.विठ्ठलाचे भक्त वारकरी दरवर्षी विविध राज्याच्या विविध भागातून सहभागी होतात. पंढरपूर शहरात आषाढी एकादशीला यात्रेची सांगता होते, जी भगवान विठ्ठलाच्या अनुयायांनी श्रद्धेने पाळली जाते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!