अध्यात्मिकआरोग्य व शिक्षणसामाजिक

मावळ तालुका वारकरी सांप्रदायाचे वतीने पंधरा सोळा दिवस वारकऱ्यांकरीता मोफत औषधे , गोळ्या , मलमचे वाटप.

Spread the love

मावळ तालुका वारकरी सांप्रदायाचे वतीने पंधरा सोळा दिवस वारकऱ्यांकरीता औषधे , गोळ्या , मलमचे वाटप.Distribution of medicines, tablets, ointments to the Warkaris for fifteen sixteen days on behalf of Maval Taluka Warkari Sampradaya.

आवाज न्यूज : पंढरपूर ( विशेष प्रतिनिधी ) १ जुलै.

मावळ तालुका वारकरी संप्रदायाच्या वतीने पंधरा सोळा दिवस वारकऱ्यांकरीता औषधे , गोळ्या , मलम यांचे वाटप करून वारकऱ्यांची मोफत सेवा करण्यात आली.
. मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळास औषधे व गोळ्यांचा पुरवठा स्पर्श हाॕस्पिटलच्या वतीने तसेच मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाचे आधारस्तंभ रमेशसिंहजी व्यास यांचेतर्फे करण्यात आला. रूग्णवाहिका ए वन चिक्की चे मालक. व्यास यांचेतर्फे देण्यात आलेल्या रूग्णवाहिकेतून ही वारकऱ्यांकरीता मोफत गोळ्या व औषधे वाटप करण्यात आली.तसेच बुवांची मिसळचे मालक उद्योजक अनिलभाऊ गायकवाड यांचे तर्फे उपलब्ध करण्यात आलेल्या रूग्णवाहिका मार्फत आजारी व अपघातग्रस्त रूग्णसेवा यांची रूग्णालयात ने आण करण्यात येत होती.

या वेळी मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नंदकुमार भसे , सचिव रामदास पडवळ कोषाध्यक्ष बजरंग घारे , प्रवक्ते सुनिल महाराज वरघडे , तसेच निलेश शेटे , आरौग्य सेवा समिती आध्यक्ष राजाराम आसवले , उपाध्यक्ष व पञकार भाऊसाहेब हुलावळे , औढोली ग्रामप्रतिनिधी व पञकार मच्छिंद्र मांडेकर , वेहेरगावचे ग्रामप्रतिनिधी मारूती तुकाराम देवकर , बाळासाहेब देशमुख , सुरेश बिनगुडे , सोमाटणेफाटा येथील स्पर्श हाॕस्पिटलचे डायरेक्टर डाॕ.आमित वाघ , आरोग्य कर्मचारी सो.सोनाली शेलार , व त्यांमधील डाॕक्टरांच्या टीम यांचे विशेष सहकार्य लाभले.

या आरोग्य वारीमधून मावळातील संत गोरा कुंभार दिंडी , भंडारा डोंगर , भामचंद्र डोंगर , घोरावडेश्वर डोंगर परिसरातील दिंड्या श्री. पोटोबा महाराज दिंडी , मावळ तालुका दिंडी समाज , संत सेना महाराज दिंडी आदी सह पवनमावळ दिंडीसमाज या सर्व दिंड्यांना वारीत असताना भेट देवून वारकऱ्यांचे सेवेसाठी मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाने परिश्रम घेतले. यावेळी दशमीला वाखरी येथे एकादशी व बारशीला चंद्रभागा येथे वारकऱ्यांचे सेवेत सर्वजण मग्न झाले होते.या आरोग्य दिंडीसाठी मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळास औषध पुरवठा , गोळ्या व मलम यांचा पुरवठा प्राथमिक आरोग्य केंद्र आढले , प्राथमिक आरोग्य केँद्र येळसे , लोणावळा नगरपरिषद , मावळ पंचायत समिती , तसेच रमेशसिंहजी व्यास , आणि स्पर्श हाॕस्पिटलचे माध्यमातून झाला.

यासाठी मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार भसे , आरोग्य विभाग प्रमुख राजाराम आसवले , माजी पंचायत समिती सभापती नितीनदादा घोटकुले , प्रवक्ते सुनिल महाराज वरघडे आणि मा.सभापती व मंडळाचे कार्याध्यक्ष संतोष महाराज कुंभार यांनी विशेष सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!