आपला जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

भुशीडॅम मुळे लोणावळा खंडाळा जाम.

पर्यटक मस्त तर, स्थानिक नागरिक ञस्त.

Spread the love

भुशीडॅम मुळे लोणावळा- खंडाळा जाम.पर्यटक मस्त तर, स्थानिक नागरिक ञस्त.Lonavala-Khandala jam due to Bhushidam. Tourists are good, local people are bad.

आवाज न्यूज: लोणावळा प्रतिनिधी, २ जुलै.

पर्यटकांचं आकर्षण असलेलं लोणावळ्यातील ‘भुशी धरण’ ओव्हरफ्लो लोणावळ्यामधील प्रसिद्ध भुशी धरण ओव्हरफ्लो झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून लोणावळ्यासह मावळ परिसरात सतत कोसळत असलेल्या पावसामुळे बहुतांश धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

लोणावळ्यामधील प्रसिद्ध भुशी धरण ओव्हरफ्लो झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून लोणावळ्यासह मावळ परिसरात सतत कोसळत असलेल्या पावसामुळे बहुतांश धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. परिसरातील धबधबेदेखील वाहू लागले आहेत. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले भुशी धरणदेखील ओव्हरफ्लो झाले असून पायऱ्यावरून पाणी ओसंडून वाहात आहे.

गेल्या वर्षी भुशी धरण जून महिन्यामध्येच ओव्हर फ्लो झाले होते. कोसळत असलेल्या पावसामुळे लोणावळ्यातील निसर्ग सौंदर्य अधिकच सुंदर दिसत आहे. लोणावळ्यात गेल्या २४ तासांत १५८ मिमी पाऊस कोसळला आहे.

वर्षाविहारासाठी शेकडो पर्यटक लोणावळ्यात दाखल होत असतात. पावसाची संततधार सुरू असल्याने इतर ठिकाणी धबधबे कोसाळायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे लोणावळा परिसराचे निसर्ग सौंदर्य खुलले आहे. आज भुशी धरण ‘ओव्हरफ्लो’ झाले. भुशी धरण तसेच परिसरातील धबधबे कोसळू लागल्याने पर्यटकांचा ओघ वाढल्याने . पावसाचा जोर चांगला असल्याने धरण ‘ओव्हरफ्लो’ झाल्यावर परिसरातील नागरिक तसेच पर्यटकांनीही या ठिकाणी धाव घेतली. भूशी डॅमच्या पाय-यावरून आणि सांडव्यांवरून पाणी वाहत आहे.मुंबई, पुण्यासह महाराष्ट्राच्या विविध भागांतून पर्यटक लोणावळ्यात दाखल होतात. भुशी धरण हे पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे. तरुणांपासून लहानग्यांपर्यंत सर्वच पर्यटक भुशी धरणावर बघायला मिळतात. भुशी धरण ओव्हरफ्लो झाल्याने लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी झाल्याने. लोणावळा पोलिसांनीदेखील वाहतूक कोंडीबाबत कंबर कसली आहे.

पर्यटकांने पहिल्याच रविवारी धबधबा पाहण्यासाठी लोणावळा खंडाळा येथे, येवढी गर्दी केली की, हायवेला झाला चक्काजाम, स्थानिक नागरिक अक्षरशा वैतागून गेले, घरातुन बाहेर निघण्यासाठी तयार नाहीत, त्यात मधुनच पडणारा पाऊस, ट्राफिक निस्तारत पोलिसांना देखील नाकी नऊ आले.कुमार रिसॉर्ट, हायवे, गवळीवाडा, लोणावळा गावठाण सर्व जाम झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!