आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणसामाजिक

गुरुपौर्णिमा आणि डॉक्टर डे हे दोन्ही समारंभ लायन्स क्लब तळेगावने अतिशय प्रसन्न वातावरणात संपन्न..

Spread the love

गुरुपौर्णिमा आणि डॉक्टर डे हे दोन्ही समारंभ लायन्स क्लब तळेगावने अतिशय प्रसन्न वातावरणात संपन्न. Both Gurupurnima and Doctor’s Day celebrations were concluded by Lions Club Talegaon in a very happy atmosphere.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, ५ जुलै.

लायन्स क्लब तळेगाव आयोजित डॉक्टर डे आणि गुरुपौर्णिमा ला डॉ दीपकशहा सभागृहात अत्यंत प्रसन्न वातावरणात संपन्न. प्रास्ताविकात कीर्तनकार व्यास यांनी गुरूंच्या हजारो वर्षांपूर्वीच्या परंपरेची माहिती सभागृहास दिली.दिपप्रज्वलनानंतर नवनिर्वाचित ला. अध्यक्ष अनिकेत काळोखे यांनी सर्वप्रथम उपस्थितांचे स्वागत केले. शिष्यांनी आत्मसात केलेल्या गुरूंच्या ज्ञानामृतातून समाजाची विविध क्षेत्रात झालेली प्रगती ही लायन अध्यक्ष. अनिकेत यांनी पुढे आपल्या मनोगतात व्यक्त केली. योगा गुरु आदरणीय विठ्ठल गोंधळेकर आणि गुरुवर्य. प्रदीप साठे या उभयतांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. रोटरियन मनोज ढमाले यांनी मानवी जीवनात गुरु आणि डॉक्टर यांचं किती महत्त्व आहे हे विविध उदाहरणाद्वारे आपल्या मनोगतातून स्पष्ट केले.

लायन राजेंद्र झोरे यांनी गरुड पक्षाच्या ७५ वर्षाच्या आयुष्यातील स्थितंतरद्वारे मानवी जीवन सुद्धा आपण कसं जगलं पाहिजे हे सउदाहरण सभागृहास पटवून दिले. ज्येष्ठ लायन डॉक्टर शाळीग्राम भंडारी यांनी- त्यांचा सत्कार केल्याबद्दल सर्वप्रथम कृतज्ञता व्यक्त केली. मानवी जीवनात पावला पावलावर आपल्याला गुरु भेटत असतात!, आपलं व्यक्तिमत्व सर्वर्थाने विकसित करीत असतात. ते कधी आईच्या तर कधी पित्याच्या तर कधी मित्राच्या रूपात भेटतात. कधी कधी देव देवतांच्या रूपात भेटून आपल्याला खूप गोष्टी शिकवून जातात! म्हणूनच आहारात सत्व वागण्यात तत्व बोलण्यात ममत्व आल्याने आपल्या जीवनाला महत्त्व प्राप्त होते! अशा गुरूंविषयी आणि डॉक्टरांविषयी कृतज्ञ असणे हीच खरी आदर्श जीवन प्रणालीची अभिव्यक्ती आहे असे डॉक्टर पुढे म्हणाले.

ज्येष्ठ लायन नंदकुमार काळोखे यांनी या देखण्या समारंभाचा समारोप करताना- सर्वप्रथम प्रत्येकात वसलेल्या गुरूला त्यांनी वंदन केले. आदर्श गुरु भेटणे हे भाग्यवंताचे लक्षण आहे या अर्थाने आपण सर्व भाग्यवान आहोत असेही ते पुढे म्हणाले. डॉक्टर डे आणि गुरुपौर्णिमा हा संयुक्त कृतज्ञता सोहळा आयोजित केल्याबद्दल लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले.

लायन. राधेश्याम भंडारींनी शेरोशायरी आणि काव्याच्या माध्यमातून उत्तम सूत्रसंचालन केले.  प्रकल्प अधिकारी लायन भरत पोतदार आणि योगा साधक विश्वनाथ काळोखे यांच्या अथक प्रयत्नातूनच हा समारंभ यशस्वी झाला. ला. प्रियांका काळोखे यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!