आपला जिल्हाकृषीवार्तासामाजिक

हिंदमाता भुयारी मार्ग येथे असणा-या ऑक्सिजन पार्कमध्ये, २५० वृक्षांचे वृक्षारोपन…

तळेगाव दाभाडे नगरपरिषद व लायन्स क्लब ऑफ तळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने, मुख्याधिकारी एन. के. पाटील व माजी प्रांतपाल दिपकभाई शहा यांच्या मार्गदर्शनाखाली ४ जुलै रोजी कार्यक्रम करण्यात आला..

Spread the love

हिंदमाता भुयारी मार्ग येथे असणा-या ऑक्सिजन पार्कमध्ये, २५० वृक्षांचे वृक्षारोपन…At the Oxygen Park at Hindmata Subway, plantation of 250 trees…

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, ६ जुलै.

तळेगाव दाभाडे नगरपरिषद व लायन्स क्लब ऑफ तळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने, मुख्याधिकारी एन. के. पाटील व माजी प्रांतपाल दिपकभाई शहा यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील हिंदमाता भुयारी मार्ग येथे असणा-या ऑक्सिजन पार्कमध्ये २५० वृक्षांचे वृक्षारोपन, गार्डनबेंच, पक्षांसाठी घरटी, डस्टबिन व प्रेरणादायी होर्डींग यांचे उद्धघाटन करण्यात आले.

प्रसंगी लायन्स क्लब अध्यक्ष अनिकेत नंदकुमार काळोखे व प्रेरणास्थान महेशभाई शहा यांचा वाढदिवसही साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे आयोजन उद्यान विभाग प्रमुख सिध्देश्वर महाजन व लायन्स क्लब चे स्पॉन्सर शैलेशभाई शहा यांनी केले. या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून मा. मुख्याधिकारी एन. के. पाटील, उपमुख्याधिकारी ममता राठोड व लायन्स क्लब अध्यक्ष. अनिकेत नंदकुमार काळोखे उपस्थित होते.

तसेच कार्यालयीन प्रमुख रविंद्र काळोखे, शहर समन्वयक गीतांजली होणमने, रणजीत सुर्यवंशी तसेच लायन्सक्लबचे सेक्रेटरी सुचित्रा चौधरी, ट्रेझरर प्रकाश पटेल, अक्टिविटी चेअरमन दिपकभाई बाळसराफ व इतर नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी व लायन्स क्लबचे इतर सदस्य यांनी उस्फूर्त सहभाग नोंदवून पर्यावरण संवर्धनासाठी माझी वसुंधरा ४.० अंतर्गत ई शपथ देखील घेतली. सदर प्रसंगी मा. मुख्याधिकारी एन. के. पाटील यांनी “झाडे लावा, सृष्टी वाचवा”, सिंगल यूज प्लास्टिक वापर कमी करा, प्रदूषण कमी करून प्राणीमात्रांचे संरक्षण करा, ई-व्हेईकल्सचा वापर करा, रेन वॉटर हार्वेस्टिंग करा, सोलर वॉटर हिटरचा वापर करा, LED दिव्यांचा वापर करा असे जाहिर आवाहन तळेगाव दाभाडे शहरातील नागरिकांना केले व उपमुख्याधिकारी ममता राठोड यांनी “झाडे लावा, झाडे जगवा, भविष्य वाचवा, जीवन फुलवा” असा संदेश उपस्थितांना दिला.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!