आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणसामाजिक

शाळा संपूर्ण संगणक शिक्षणासाठी तयार,सोलर सिस्टीम साठीही प्रयत्न.प्रफुल्ल कुमार निकम यांचे प्रतिपादन.

डिजिटल ट्रेनिंग सेंटर चे उभारणीस तयार झालो , ते व्हीपीएस मधील प्राचार्य , शिक्षकांचा , शिक्षकेतर यांचा सकारात्मक दृष्टिकोन यामुळे,प्रफुल्ल कुमार निकम यांचे प्रतिपादन.

Spread the love

शाळा संपूर्ण संगणक शिक्षणासाठी तयार, सोलर सिस्टीम साठीही प्रयत्न.प्रफुल्ल कुमार निकम यांचे प्रतिपादन. School is ready for full computer education. Efforts for solar system also. Assertion by Prafulla Kumar Nikam.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी, ११ जुलै.

डिजिटल ट्रेनिंग सेंटर चे उभारणीस तयार झालो. संस्थेमधील शिक्षकांचे फक्त सांगणे हा दृष्टिकोन सर्वञ आढळला; पण येथील शिक्षकांचा दृष्टिकोन स्विकारणे , दुसऱ्या व्यक्तींची भावना , विचार ऐकून घेणे हा असल्यामुळे आम्ही या शाळा व संस्थेला सुमारे दोन लाखांचे वीस संगणक संच देऊ केला. आज वर्ग उपलब्ध करून दिल्यामुळे संगणक प्रशिक्षण केँद्र उभे राहिले,असे वाय फाॕर डी या संस्थेचे अध्यक्ष. प्रफुल्ल कुमार निकम यांनी उद्घाटन प्रसंगी सांगितले.

निकम पुढे म्हणाले , छञपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आपल्याला जाणून घ्यायचा असल्यास पुस्तके वाचल्याने समजत असे,  आता युट्युबला आपल्याला घरबसल्या हे फोनवरून पहायला , वाचायला मिळते.जशीजशी संगणक युग , व डिजिटल युग बदलेल,तसे आपण बदलायला पाहिजे.आम्हाला शक्य झाल्यास शाळेच्या सोलर विद्युतीकरणासाठी पॕनाॕसाॕनिक कंपनी बरोबर बोलणी करून विषय मार्गी लावू असे आश्वासन देखील दिले.

यावेळी व्हीपीएस शाळा समिती अध्यक्ष भगवान आंबेकर , विद्या प्रसारिणी सभेचे प्राचार्य महेंद्रकर यांचीही भाषणे झाली.माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष बाळासाहेब पायगुडे , पदाधिकारी उमेश तारे , सुरेश गायकवाड , योगिता कोकरे मॕडम , ललित सिसोदिया , दत्ताञेय येवले , अरविंदभाई मेहता , गिरिशजी पारख , आणि रमेश लुणावत आदी माजी विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.यावेळी बाळासाहेब पायगुडे म्हणाले , आम्ही १९३२ पासूनचे बॕचचे माजी विद्यार्थांना अवाहन करून मेळावा घेतला. शाळा ईमारतीला विजेच्या बिलापासून मुक्ती मिळण्यासाठी सोलर सिस्टीम बसवून देण्याचा मानस आहे , त्याआधी आम्ही डिजिटल ट्रेनिंग सेंटर उभारण्याचा मनोदय वाय 4डी या व शेअर अँन्ड केअर या संस्थेच्यावतीने हे प्रशिक्षण केंद्र सुरू झाले.पुढील वर्षी दुसऱ्या केंद्राचे उद्घाटनासाठी एकञ येऊ. शाळा संपूर्ण संगणक शिक्षणासाठी तयार आहे.सोलर सिस्टीम साठीही प्रयत्न करत आहोत.

अध्यक्षीय भाषणात शाळा समितीचे अध्यक्ष भगवान आंबेकर सर यांनी संपूर्ण आढावा घेतला. ते म्हणाले , विद्या प्रसारिणी सभेत सुमारे ४२०० विद्यार्थी शिक्षण घेतात. वीस विद्यार्थांना हे संगणक प्रशिक्षण केंद्र सुरू झाले असून याचा आनंद होत आहे.वाय 4डी चे अध्यक्ष व शेअर अँड केअर संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल कुमार निकम, उपाध्यक्ष अरूण घोलप , विमल सोनी चे संचालक राहुल पाटील , शाळा समिती संचालक अॕड.संदिप आगरवाल , संचालक अरविंदभाई मेहता , उद्योजक व गिरीशजी पारख , बाळासाहेब पायगुडे , राजेश मेहता , शाळा समिती सदस्य धिरूभाई टेलर , सुरेश गायकवाड आदी माजी विद्यार्थी यांचेतर्फे मोलाचे योगदान लाभले.

मळवली , वाकसई व लोणावळा येथे २६ विद्याशाखांमधून पाचवी ते दहावी सुमारे आडीच हजार विद्यार्थांना संगणक प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे व्हीपीएस हा ब्रँड बनला आहे.लोणावळ्याच्या सर्व शाळामिळून ९०% विद्यार्थी आपल्या शाळेचे आहेत.७२ वर्षे संस्थेचे कै.गो.व्यं .शिंगरे तथा बाबा यांनी संस्थेच्या करीता परिश्रम घेतले.१९६५चे माजी विद्यार्थी अरविंदभाई मेहता , ९२वयाचे आवटी सर, तसेच आर.एम.कुलकर्णी , तसेच शाळेच्या संस्थेच्या अध्यक्षा मृणालताई गरवारे आदींनी परिश्रम घेतले.यावेळी वाय 4डी चे उपाध्यक्ष ब्रिजेशकुमार निकम , प्रशिक्षण देणारे शिक्षक आदित्य देशमुख , आदी उपस्थित होते.

माजी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी सुरेश गायकवाड यांचेतर्फे पन्नास हजाराचा धनादेश संस्थेला देण्यात आला.
यावेळी त्यांचा प्राचार्य व्ही.पी. महेंद्रकर यांचेतर्फे सत्कार करण्यात आला.यावेळी माजी विद्यार्थी रमेश लुणावत यांनी पाच हजाराचा धनादेश दिला.यावेळी, लुणावत म्हणाले , १९९० चे बॕचचे वेळी सोलर पॕनल उभारायचे  कै.सूर्यकांत शहा व कै.मो.म.आगरवाल यांनी प्रयत्न केले होते.
विद्यार्थी मिञांनो आपण भाग्यवान आहात , संगणक सुविधा सहज उपलब्ध होत आहेत.याकरीता मी पाच हजार मदत देतो.यावेळी शाळेच्या विद्यार्थीनीचे हस्ते व शाळा समिती सदस्य अरविंदभाई मेहता व वाय 4डी संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल कुमार निकम यांचे हस्ते फीत कापून व दिप प्रज्वलनाने आणि सरस्वती पूजनाने प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संगणकाच्या केँद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी विद्यार्थी संघाचे बाळासाहेब पायगुडे , उमेश तारे , योगिता कोकरे , सुरेश गायकवाड , गिरीशजी पारख , राजेश मेहता , ललीत सिसोदिया , आदींचा तसेच आरविंद भाई मेहता , रमेश लुणावत , धिरूभाई टेलर , प्रमुख पाहुणे व शाळा समिती अध्यक्ष. भगवान आंबेकर यांचा सत्कार शाल, श्रीफळ,  पुष्पगुच्छ देवून करण्यात आला.यावेळी गजेंद्रगडकरसर , जोशीसर , माजी नगरसेवक दिलीप तथा भिकुदादा लोंढे , चिञकला शिक्षक चोणगे, कोठावळेसर, उपप्राचार्य ऐ.के.दहिफळे सर आदी उपस्थित होते.

यावेळी काळेसर यांनी स्वागतगीत व ईशस्तवन गायले. सूञसंचालन .खामकर सर यांनी केले.
आभार प्रदर्शन पर्यवेक्षक व्ही.डी.रसाळ यांनी केले. पसायदान शाळेच्या उपप्राचार्या.एस.एस.ढिले यांनी गायले.व कार्यक्रमाची सांगता झाली..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!