आपला जिल्हासामाजिक

रस्त्यावर वाहने उभी केली तर होणार कारवाई.सत्यसाई कार्तिक..

वाहन चालकांनो सावधान. लोणावळा शहर पोलिसांच्या ताफ्यात दोन क्रेन दाखल

Spread the love

रस्त्यावर वाहने उभी केली तर होणार कारवाई.. सत्यसाई कार्तिक; वाहन चालकांनो सावधान. लोणावळा शहर पोलिसांच्या ताफ्यात दोन क्रेन दाखल..Action will be taken if vehicles are parked on the road.. Sathyasai Karthik; Drivers beware. Two cranes entered in the police fleet of Lonavala city.

आवाज न्यूज : लोणावळा, प्रतिनिधी ११ जुलै.

लोणावळा शहरात रस्त्यावर वाहतुकीला अडथळा होईल अशी वाहने उभी करणार असला तर सावधान! आपले ही वाहन ओडून नेहण्याची शक्यता नाकारता येणार नाही. लोणावळा शहर पोलिसांच्या ताफ्यात आजपासून दोन क्रेन (टोव्हिंग व्हॅन) दाखल झाल्या आहेत. सकाळी लोणावळा उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक व लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्या हस्ते या दोन्ही टोव्हिंग व्हॅनच्या कार्याचा शुभारंभ करण्यात आला. एक टोव्हिंग व्हॅन ही चारचाकी वाहनांसाठी तर दुसरी दुचाकी वाहने उचलण्यासाठी असणार आहे. टोव्हिंग व्हॅन कार्यान्वित होताच त्यांनी शहरातील अंतर्गत रस्ते व हायवेवर वाहतुकीसाठी अडथळा ठरणारे वाहने उचलण्यास सुरुवात केली आहे.

याविषयी बोलताना सत्यसाई कार्तिक म्हणाले, लोणावळा शहर हे पर्यटनस्थळ असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. अनेक पर्यटक रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरतील अशी वाहने उभी करतात, त्यामुळे वाहतूककोंडी होत आहे. अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाते मात्र चालक वाहन लावून गेलेला असतो त्यामुळे वाहतूककोंडी होत रहाते. आता मात्र टोव्हिंग व्हॅनच्या सहाय्याने अशी अडथळा ठरणारी वाहने उचलली जाणार आहेत.

माझी सर्व पर्यटक व शहरातील नागरिकांना विनंती आहे कोणीही रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरतील अशी वाहने लावू नयेत. अन्यथा आपल्यावर कारवाई होऊ शकते. वाहतूककोंडीमुळे केवळ पर्यटक नाही तर शहरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. शहरातील वाहतूककोंडी सुरळीत सुरु रहावी याकरिता सर्वांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!