आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणराजकीय

वडगाव बाजारपेठ मधील राहिलेले साईड ब्लॉक चे कामास, नगरपंचायतीचाच अडथळा.

व्यापारी व ग्राहक यांना याचा नाहक त्रास काम लवकर करण्यासाठी वडगाव भाजपा युवा मोर्चाचे, नगरपंचायतीला निवेदन.

Spread the love

वडगाव बाजारपेठ मधील राहिलेले साईड ब्लॉक चे कामास, नगरपंचायतीचाच अडथळा. वडगाव भाजपा युवा मोर्चाचे, नगरपंचायत ला निवेदन.The work of the remaining side block in Vadgaon market is a hindrance of the municipal council.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, १२ जुलै.

वडगाव बाजारपेठ मधील राहिलेले साईड ब्लॉक चे कामास, नगरपंचायतीचाच अडथळा.व्यापारी व ग्राहक यांना याचा नाहक त्रास काम लवकर करण्यासाठी वडगाव भाजपा युवा मोर्चाचे, नगरपंचायतीला निवेदन.

वडगाव नगरपंचायत प्रशासनाकडून अपूर्ण राहिलेल्या कामामुळे प्रमुख बाजारपेठ रोड च्या दोन्ही बाजूकडील पादचारी मार्ग ( पेव्हिंग ब्लॅाक) बसविण्यातच्या कामात अडथळा निर्माण होत असल्यामुळे ,वडगाव शहर भाजपा युवा मोर्चा च्या वतिने मा. मुख्याधिकारी प्रविण निकम यांना निवेदन देण्यात आले.

तालुक्याची मुख्य बाजारपेठ असलेल्या वडगाव शहरात व्यापारानिमित्त जेष्ठ नागरिक , महिला वर्ग , लहान मुले दुकानांनी येत असताना, माागील दीड वर्षांपासून चे सुरु असलेले रोड चे काम कुठेतरी पूर्णत्वास जात असताना, साईडला ब्लॉक बसविन्याच्या ठिकाणी खड्डे पडलेले असून,पावसाचे पाणी साठल्याने चिखल झाला आहे, त्यामुळे नागरिकांना त्याचा नाहक त्रास होत आहे.

साचलेल्या पाण्यावर डेग्यूचा प्रादुर्भाव होऊन त्याची साथ वाढू शकते त्याची गंभीरपणे दखल घेवून काम त्वरीत पूर्ण करावे आशी मागणी युवा मोर्चा चे वतीने करण्यात आली आहे. याप्रसंगी वडगाव शहर भाजपा अध्यक्ष अनंता कुडे, युवा मोर्चा अध्यक्ष विनायक भेगडे , सरचिटणीस अतुल म्हाळसकर , नगरसेवक प्रविण चव्हाण , नगरसेवक रविंद्र म्हाळसकर , मा.नगरसेवक प्रसाद पिंगळे, मा.प्र.सरपंच संभाजी म्हाळसकर , चेतन बाफना , कुलदिप ढोरे ,दीपक भालेराव,समिर गुरव , गणेश भिलारे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!