महाराष्ट्रराजकीय

मावळातील कुसगाव बुद्रूक ग्रामपंचायतीचे चार सदस्य जिल्हाधिकारी यांचेकडून अपाञ..

गायरान जमिनीवर अतिक्रमण प्रकरणी कारवाई !

Spread the love

मावळातील कुसगाव बुद्रूक ग्रामपंचायतीचे चार सदस्य जिल्हाधिकारी यांचेकडून अपाञ ;गायरान जमिनीवर अतिक्रमण प्रकरणी कारवाई ! ..Four members of Kusgaon Budruk village panchayat in Maval, disobeyed by the collector; action in the case of encroachment on the land of Gairan! ..

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी १३जुलै.

मावळातील कुसगाव बुद्रूक ग्रामपंचायतीचे चार सदस्य जिल्हाधिकारी यांचेकडून अपाञ झाल्याचे प्रसिध्दी पञकात घोषित करण्यात आले.मावळ तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाची समजली जाणाऱ्या कुसगाव बुद्रूक या ग्रामपंचायतीच्या चार सदस्यांवर सरकारी जागेत आतिक्रमण केल्याप्रकरणी अपाञतेची कारवाई करण्यात आली आहे.

ग्रामपंचायत सदस्य गणेश वसंत गुंजाळ , सुजाता रामचंद्र ठुले , फरिन मज्जीद शेख , शैला भरत मोरे यांनी कुसगाव ग्रामपंचायत हद्दीतील सरकारी गायरान जागेत अतिक्रमण करीत सरकारी जागेचा बेकायदा वापर केला आहे.त्यामुळे त्यांचे सदस्यत्व कायद्याने आपाञ होत आसल्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे , अशी तक्रार माजी ग्रामपंचायत सदस्य भगवान उर्फ दादा डफळ , संदिप मानकर , प्रकाश साळवे , उमेश शेळके यांनी जिल्हाधिकारी डाॕ.राजेश देशमुख यांचेकडे केली होती. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ ज (३ ) चा संदर्भ दिला होता.

या निर्णयामुळे कुसगाव बुद्रूक येथील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. सत्तारूढ गटाचे चार सदस्य अपाञ झाल्याने संख्याबळ चारने कमी झाले.या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ माजली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!