आपला जिल्हासामाजिक

कामगारनेते.मोरेश्वर मातेरे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार समारंभ संपन्न..

कामगारनेते मोरेश्वर मातेरे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार समारंभ कुरवंडे येथे उत्साहात संपन्न झाला.

Spread the love

कामगारनेते.मोरेश्वर मातेरे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार समारंभ संपन्न..Labor leader Moreshwar Matere’s retirement felicitation ceremony concluded.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा प्रतिनिधी, १३ जुलै.

कामगारनेते मोरेश्वर मातेरे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार समारंभ कुरवंडे येथे उत्साहात संपन्न झाला. यावेळी विविध मान्यवरांनी पुष्पगुच्छ, व शाल श्रीफळ देवून सत्कार केला.
यावेळी भाषण करताना शिवसेना माजी जिल्हाप्रमुख व पुरंदरचे संपर्कप्रमुख मच्छिंद्र खराडे म्हणाले , कामगारनेते व एमईएस चे अध्यक्ष , डिफेन्स को.आॕपरेटिव्ह सहकारी सोसायटी चे आणि एमईएस कंन्झुमर को आॕपरेटिव्ह सोसायटी चे माजी संचालक तसेच कामगारनेते मोरेश्वर मारूती मातेरे यांचे ३९ वर्षे सेवेनंतर सेवानिवृत्त होत असल्याने कामगारांच्या दृष्टीने एक प्रामाणिक काम करणारे नेतृत्व सेवेतून निवृत्त होत असल्याने दुःखाचे आहे , पण बाहेरील समाजासाठी आता पूर्णपणे वेळ देवून सामाजिक , शैक्षणिक , धार्मिक , आदी क्षेत्रात भरीव काम करण्यासाठी मातेरे यांना वेळ देता येईल.

त्यांना कुटूंबातील पत्नी , आई , वडील व मुलांची मोलाची साथ लाभल्याने ते निष्ठावंत पणे काम करून आपली उन , वार , पाऊस या ऋतूत जोखमीचे काम केले आहे.
विजपुरवठा खंडीत होताच आपले लक्ष वीजपुरवठा करणा-या कामगार व अधिका-यांकडे जाते. त्या कामातून मातेरे यांनी मोठा मिञपरिवार वाढविला. कुटूंबाला आधार दिला.
त्यांनी कोणत्याही जात, धर्म , पंथाचे व्यक्तीच्या मृत्यू व शुभ प्रसंगी उपस्थित राहून तालुक्यातील शेकडो कार्यक्रमास हजेरी लावली. कुणाचा अंत्यविधी असो , दशक्रियाविधी असो , सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार असो , किर्तन असो वा भाषण ते सदैव तेथे पुढाकार घेत असत .मोलाचे मार्गदर्शन करीत.श्रध्दांजली वाहताना समाजाचे भान  ठेवले.पक्षपातीपणाने कुणाशीही वागले नाही.

यावेळी लोणावळा नगरपरिषदेच्या नगरसेविका गौरीताई मावकर आपल्या भाषणात म्हणाल्या , कामगारनेते मोरेश्वर भाऊ मातेरे यांनी काम करत असताना कौटुंबिक जिव्हाळा जपला. आमच्या शेजारी आसलेल्या त्यांच्या बहिणीच्या घरी दुःखद प्रसंगाचे वेळी त्या कुंटूबास त्यांनी मोठा आधार दिला.
यावेळी पञकार मच्छिंद्र मांडेकर , पोलिस पाटील प्रीतम ससाणे , निवेदक संघाचे शांताराम ढाकोळ , कामगारनेते ज्ञानेश्वर जांभूळकर , मनविसेचे तालुका संघटक अशोकराव कुटे , महिंद्रा कंपनी जनरल कामगार युनियनचे कामगारनेते आशोकरव सातकर , आदींनी मनोगतात मोरेश्वर मातेरे यांचे चाळीस वर्षाचे काळातील कार्याबद्दल गौरवउद्गार काढून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी जुना खंडाळा येथील माजी नगरसेविका श्रीमती अंजली ताई बाळासाहेब कडू , लोणावळा नगरपरिषद कर्मचारी सहकारी सोसायटी चे माजी अध्यक्ष अरूण मातेरे, जितेंद्र राऊत , कुरवंडे चे ग्रामपंचायत सदस्य निलेश पनीकर , स्टेट बँकेचे अधिकारी यशवंत ढाकोळ, माजी सरपंच कुसूमताई ज्ञानदेव जांभूळकर , माजी उपसरपंच श्रध्दा आरूण मातेरे , राम बोटे , मनसेचे गणेश जांभूळकर , माजी सदस्य निलेश पनीकर , वेहेरगावचे तानाजी कुटे , शिल्पकार नगरचे सामाजिक कार्यकर्ते परेशभाऊ गो.भालेराव , रोहिदास समाज मंडळाचे आध्यक्ष चंद्रकांत कदम आदींनी सत्कार केला.

या वेळी शिरूरचे मुख्याध्यापक दांपत्य दीपक आबनावे व शुभांगी आबनावे , लोणावळा नगरपरिषद कर्मचारी सोसायटी चे माजी अध्यक्ष जितेंद्र राऊत , उद्योजक सुरेश कडू , रमेश कडू , मा.पोलासपाटील ताराबाई कडू , नेवीचे माजी सैनिक बाळा विष्णू कडू , माजी सरपंच सखाराम कडू , मिलीटरी इंजिनियरींग आर्मीचे सुभेदार मेजर सोमनाथ शंकर मातेरे , आदींसह राष्ट्रवादीचे नाणेमावळ अध्यक्ष बाबाजी तथा शरद कुटे , उद्योजक शिवाजी कुटे , उद्योजक ओम विलास कुटे , आदी मान्यवरांनी यावेळी मातेरे यांना भेटून शुभेच्छा दिल्या.यावेळी कुरवंडे ग्रामपंचायतीचे सदस्य आविनाश जांभूळकर , पनीकर , एलआयसीचे एमडीआरटी दत्ताञेय मांडेकर आदी उपस्थित होते. कुसगाव बुद्रूक चे कार्यकर्ते मारूती गुंड , पाटणचे उद्योजक सतपाल तिकोणे , विनायक ट्रॕव्हलचे मालक किशोरशेठ पवार आदी मान्यवर तसेच महिंद्रा कंपनीचे अभिजित सातकर , पीडीसीसी बँकेचे संचालक पोपट राणे, भांडुप , मुंबई चे सचिन पाटील, शिरूर चे तालुकाप्रमुख राजपाल चटोले, आदींनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!