महाराष्ट्रराजकीय

राष्ट्रवादीतील प्रमुख सात महिला पदाधिकारी बडतर्फ. विद्या चव्हाण.महिला प्रदेशाध्यक्षा.

मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या आमदारांना पाठिंबा दिल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली..

Spread the love

राष्ट्रवादीतील प्रमुख सात महिला पदाधिकारी बडतर्फ. विद्या चव्हाण.महिला प्रदेशाध्यक्षा..Seven prominent women office bearers of NCP sacked. Vidya Chavan. Women Regional President.. 

आवाज न्यूज : पुणे प्रतिनिधी, १४ जुलै.


पुणे राष्ट्रवादीतील फूटीनंतर आता ज्येष्ठ नेते शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील पक्षीय स्तरावर कडक भूमिका घेण्याचे धोरण अवलंबिल्याचे चित्र दिसत आहे. या फूटीनंतर राज्यातील काही महिला पदाधिका-यांची महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी कारवाई केली आहे.

उमा मुंडे (रायगड), दीपाली पांढरे (सोलापूर), कविता आल्हाट (पिंपरी), वैशाली नागवडे (पुणे), लोचन शिवले (पुणे), शीतल हगवणे (पिंपरी चिंचवड), प्रेरणा बलकवडे (नाशिक) यांना महिला संघटनेतील पदावरुन तातडीने बडतर्फ करत असल्याचे पत्र विद्या चव्हाण यांनी जारी केले.

विद्यमान सरकारमध्ये सामील होणा-या व मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या आमदारांना पाठिंबा दिल्याचे निदर्शनासा आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.This action has been taken after it was observed that the MLAs who joined the existing government and were sworn in as ministers were being supported. हे कृत्य पक्षाच्या ध्येय धोरणांशी विसंगत विरोधी असल्याने ही कारवाई करत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

या महिला पदाधिका-यांनी या पुढील काळात राष्ट्रवादी पक्षाचे नाव, चिन्ह व ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा फोटो व नावाचा वापर करु नये, अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही या पत्रात संबंधित महिला पदाधिका-यांना देण्यात आला आहे.

या मध्ये सर्वच महिला पदाधिकारी राष्ट्रवादीच्या महत्वाच्या पदांवर कार्यरत होत्या. अजित पवार यांना पाठिंबा दिल्यानंतर त्यांना पक्षातून बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पदाधिका-यांपर्यंत त्यांच्या बडतर्फीची पत्रे पोहोचविण्यात आली आहेत.All women office bearers were working in important posts of NCP. After supporting Ajit Pawar, it has been decided to expel him from the party. Up to these officers, their superiors.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!