आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

स्वतःच्या फायदयासाठी, अनधिकृतपणे शाळा उभारून शाळेचे चालक व मालक यांनी खोललाय धंदा..

हिंजवडी पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल..

Spread the love

स्वतःच्या फायदयासाठी, अनधिकृतपणे शाळा उभारून शाळेचे चालक व मालक यांनी खोललाय धंदा..For their own benefit, the driver and owner of the school has started a business by setting up the school unofficially.

आवाज न्यूज : चिंचवड प्रतिनिधी, १४ जुलै.

अनधिकृतपणे शाळा उभारून शाळेचे चालक व मालक यांनी स्वतःच्या फायदयासाठी शाळा अधिकृत आहे, असे भासवले. अनधिकृत शाळा अधिकृत म्हणून चालवून, शासनास आवश्यक असलेला महसूल बुडवला. शासनाची, पालकांची व विदयार्थांची फसवणुक केली.फसवणूक करणाऱ्या दाेन शाळांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून, याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच शासनाने ठरवून दिलेल्या नियम व अटी यांची कोणत्याही कागदपत्रांची पूर्तता न करता शाळा सूरू केली. विदयार्थांची अनधिकृतरित्या भरती करून, पटावर नोंदणी केली. विदयार्थांकडून अनधिकृतपणे भरमसाठ फी वसूल केली. शाळा अनाधिकृत असूनसुध्दा शाळा अधिकृत आहे ,असे भासवून  विदयार्थांचा शाळा सोडल्याचे दाखले घेणे-देणे अशा बेकायदेशीर बाबी केल्या.

याप्रकरणी जिल्हा परिषदेचे केंद्रप्रमुख सुरेश लक्ष्मण साबळे यांनी पोलिसांकडे हिंजवडीतील बुधराणी नाॅलेज फाऊंडेशन संचालित ब्लिस इंडीफाय इंटरनॅशनल स्कुलचे मुख्याध्यापक सिझी अली खान, फाऊंडेशनचे मालक गाैतम बुधराणी व शैक्षणिक संस्थेचे संचालक व चालक यांचे विराेधात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार सुरेश साबळे हे केंद्रप्रमुख असल्याने त्यांचे अखत्यारीत शाळांची तपासणी ते करत हाेते. त्यावेळी बुधराणी शाळेकडे काेणत्याही शाळा चालवण्यासाठी आवश्यक शासन मान्यता कागदपत्रे नसल्याचे दिसून आले.

सदरची शाळा सप्टेंबर २०२२ पासून सुरु झाली असून शाळेत इयत्ता पहिली ते आठवीचे वर्ग असून एकूण ११६ विद्यार्थी शिक्षण घेत आहे. सदर विद्यार्थ्यांकडून अनाधिकृतपणे भरमसाठ फी देखील वसूल करुन पालकांची फसवणूक करण्यात आली आहे.संस्थेचे अध्यक्ष. मालक शैक्षणीक संस्थेचे संचालक व चालक यांच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात ७८९ आणि ७९०/२०२३ भा.दं.वि. कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!