आपला जिल्हाक्राईम न्युज

गांजा वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक..

लोणावळा ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई

Spread the love

गांजा वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक ; लोणावळा ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई.Two arrested for transporting ganja; Lonavala rural police strike action.

आवाज न्यूज : लोणावळा प्रतिनिधी, १४ जुलै.

संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत अवैधरित्या गांजा वाहतूक करणाऱ्या छोटया टेम्पोला पकडून तब्बल २० किलो गांजासह ६.५०,००० रु. चा मुद्देमाल जप्त करत लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाने धडाकेबाज कारवाई केली आहे.सहा.पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांच्या सुचनेनुसार संकल्प नशामुक्ती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियांनार्तगत विभागामध्ये दारुविक्री, वाहतूक, गुटखा वाहतूक, गुटखा विक्री, गांजा वाहतूक व विक्री अशा केसेस करण्यात आलेल्या आहेत.

या संकल्प नशामुक्ती अभियानातून लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये १) गांजाचे सेवन करणारे ४ लोकांविरुध्द कारवाई,२) अवैधरित्या गुटखा वाहतूक करणाऱ्या, वाहनावर कारवाई,त्यामध्ये ६,८३,०००रुपयांचा गुटखा व वाहन.३) दारुबंदी कायदयाखाली तब्बल २७ गुन्हे दाखल करण्यात आले असून यामध्ये एकूण २,९४,००० रुपये किंमतीची देशी, विदेशी व गावठी दारु आदी कारवाया करण्यात आल्या आहेत.

तसेच दि.११ रोजी ग्रे रंगाचा छोटा हत्ती मालवाहु टेम्पो नं. MH48 CB 1828 यामधून मुंबई ते पुणे रोडने मुंबई बाजूकडून पुणे बाजूकडे गांजाची वाहतूक होत आहे. अशी पोलीस अंमलदार केतन तळपे यांना खात्रीशिर बातमी मिळाल्याने लागलीच छापा कारवाई करीता वरीष्ठांना कळवून त्यांचे परवानगीने मौजे वरसोली ता. मावळ जि. पुणे गावचे हद्दीमध्ये मुंबई ते पुणे हायवे रोडवर एम.एस.ई. बी. रेस्ट हाउसचे समोर सापळा रचून अत्यंत शिताफीने टेम्पो पकडला.

त्यामध्ये इसम नामे १) अशोक भूजंग चव्हाण( वय ४३ वर्षे, रा. धामणी खालापूर ता. खालापूर जि. रायगड व २) शंकर भगवान साळुंखे (वय ३० वर्षे,रा. ठोंबरेवाडी लोणावळा ता. मावळ जि. पुणे) यांचेसह सदर टेम्पोची झडती मध्ये २० किलो बिया-बोंडासह हिरवट काळसर तपकीरी रंगाचा ओलसर गांजा हा अंमली पदार्थ व औमपो असा एकुण ६,५०,००० रुपयाचा माल जप्त करण्यामध्ये लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनला यश आले आहे.

 

सदरबाबत यातील आरोपींच्याविरुध्द लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम सन 1985 चे कलम 8(क), 20(ब), भा.दं.वि.का.क.34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अशा प्रकारचा माल सप्लाय करणारे लोकांची फारमोठी साखळी असण्याची शक्यता आहे असा पोलीसांचा अंदाज असून त्या दृष्टीने तपास चालू असल्याची माहिती लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी दिली आहे.

सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकीत गोयल,अपर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे,सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तीक, यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ,सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास करंडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक युवराज बनसोडे, पोलीस नाईक गणेश होळकर, पोलीस अंमलदार केतन तळपे, राहुल खैरे, प्रशांत तुरे यांनी ही धडकेबाज कारवाई केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!