आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणसामाजिक

सरस्वती विद्यामंदिर मध्ये जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात साजरा..

Spread the love

सरस्वती विद्यामंदिर मध्ये जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात साजरा..World Population Day celebrated in Saraswati Vidya Mandir.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, १४ जुलै.

मंगळवार दिनांक ११ जुलै २०२३ रोजी सरस्वती विद्यामंदिर तळेगाव दाभाडे येथील माध्यमिक विभागात राष्ट्रीय हरित सेना , निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला.

यावेळी छाया सांगळे बाईंनी लोकसंख्या दिनाची माहिती सांगितली. त्याचप्रमाणे श्रेया खालकर, भाविका खुरंगे ,समृद्धी नाईक ,यशदा हेन्द्रे ,प्रणिती स्वामी या विद्यार्थिनींनी लोकसंख्या दिनाची माहिती सांगितली.मुख्याध्यापिका  रेखा परदेशी यांनी भारत, आज सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जगातील एक देश असून या लोकसंख्येचा वापर आपण सकारात्मक रीतीने कसा करून घेतला पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले.

पर्यावरण शिक्षक.  संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांची शाळेच्या परिसरातून जनजागृती फेरी काढण्यात आली .यावेळी विद्यार्थ्यांनी लोकसंख्या दिन जागृती विषयक घोषणा दिल्या. विद्यार्थ्यांबरोबर सविता केंगले बाई उपस्थित होत्या. सरस्वती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष. सुरेश झेंड,उपाध्यक्ष  दिलीप कुलकर्णी, अंमलबजावणी अधिकारी  अनंत भोपळे ,कार्यवाह. प्रमोद देशक ,खजिनदार. सुचित्रा ताई चौधरी ,शिक्षण मंडळ सदस्य डॉक्टर. ज्योती चोळकर ,सदस्य  विश्वास देशपांडे,  सुनील आगळे यांनी सर्व विद्यार्थ्यांना जागतिक लोकसंख्या दिनाच्या  शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!