आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजन

साते येथील कंपनीत अडकलेल्या भेकरास वन्यजीव रक्षक संस्थेकडून जीवदान

Spread the love

 

साते येथील कंपनीत अडकलेल्या भेकरास वन्यजीव रक्षक संस्थेकडून जीवदान

आवाज न्यूज:टाकवे बुद्रुक : साते येथील कंपनीत अडकलेल्या भेकरास वन्यजीव रक्षक संस्थेकडून जीवदान देण्यात आले आहे. या भेकराला वन्यजीव रक्षक व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तळेगाव येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल केले व त्याची प्राथमिक तपासणी, प्रथमोपचार करून साते शेजारील वनक्षेत्रात सोडून दिले असल्याची माहीती निलेश गराडे यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, वडगाव मावळ  येथील सेफ एक्सप्रेस नावाच्या कंपनीत आज शनिवारी (दि. २५) रोजी सकाळी एक भेकर घुसले असून त्याला सुरक्षितपणे पकडूून
ठेवले असल्याची माहिती येथील कर्मचारी दत्ता माकर यांनी वन्यजीव रक्षक टीमचे संस्थापक अध्यक्ष निलेश गराडे व मिथुन गाभने यांना दिली.

या माहितीच्या आधारे लगेच वन्यजीव रक्षक टीमचे अध्यक्ष अनिल आंद्रे, सदस्य जिगर सोळंकी, निनाद काकडे, दक्ष काटकर, सचिन वाडेकर व वनविभागाचे वनरक्षक संदीप जांभूळकर, आशा शेळके, मोहिनी शिरसाट आणि शिवाजी बुंदे यांनी कंपनीत जाऊन भेकराला सुरक्षिपणे ताब्यात घेतले. तळेगाव येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल केले व त्याची प्राथमिक तपासणी, प्रथमोपचार करून साते गावाशेजारील वनक्षेत्रात सोडून दिले असल्याची माहीती निलेश गराडे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!