आपला जिल्हापर्यटनसामाजिक

भाजेतील धोदाणीचा धबधबा ग्रामपंचायतीने पायऱ्या बांधून केला सुरक्षित..

कुंडाचे ओहोळाचा धबधबा ठरतोय पर्यटकांचे आकर्षण..

Spread the love

भाजेतील धोदाणीचा धबधबा ग्रामपंचायतीने पायऱ्या बांधून केला सुरक्षित ;तर कुंडाचे ओहोळाचा धबधबा ठरतोय पर्यटकांचे आकर्षण..The Dhodani waterfall in Bhaje has been made safe by the Gram Panchayat by building steps, while the Ohola waterfall in Kunda is becoming an attraction for tourists.

आवाज न्यूज :  मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा प्रतिनिधी १७ जुलै.

भाजेतील धोदाणीचा धबधबा ग्रामपंचायतीने पायऱ्या बांधून सुरक्षित केला आहे ; ;तर कुंडाचे ओहोळाचा धबधबा शेकडो पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. भाजेतील संपर्क बालग्रामचे पुढे लोहगड रस्त्यावर हा आकर्षक फेसाळणारा धबधबा निसर्ग सौदर्याचा नमुना आहे.

अत्यंत सुंदर असे हे नयनमनोहर व हिरव्या गार झाडीमधून खाली ओसंडून वाहणारे धबधबे पर्यटकांचे महत्वाचे आकर्षण ठरताना दिसत आहे.भाजे ग्रामपंचायतीचे वतीने कोट्यावधी रूपयांच्या विकास कामांचे मधून रस्ते , पादचारी रस्ता , तसेच कॉंक्रीट रस्ता , चौक तसेच हा धोधाणीचा धबधबा येथे दगडी पायऱ्या बांधून भुशीडॕम प्रमाणे आकर्षक सुरक्षेसाठी चांगली व्यवस्था केली आहे.

क्रमांक दोनचा कुंडाचे ओहोळावरून वाहणारा पांढऱ्या शुभ्र फेसाळणारे पाणी असलेला धबधबा लोहगड रस्त्यावर पर्यटकांचे महत्वाचे आकर्षण ठरताना दिसत आहे.
येथे मक्याचे गरमागरम कणीस , वाफाळलेला चहा , काॕफी , मॕगी , काॕर्नभजी , कांदाभजी , बटाटा भजी , तसेच आमलेट , भुर्जी , खेकडे थाळी , मटन भाकरी , चिकन थाळी आदीवर ताव मारताना पर्यटक , शाळा , महाविद्यालयाचे विद्यार्थी , कामगार , दिसत होते.येथील ग्रामस्थांतर्फे पावसात भिजू नये म्हणून निवारा, टपरी, हातगाडी, आणि हाॕटेलमधे विविध पदार्थ विक्री करून रोजगार मिळवताना दिसत आहे.

ग्रामपंचायतीच्या कारभारावर पर्यटक नाराज : ग्रामपंचायतीचे वतीने विकास कामे चालू आसूनही स्वच्छतागृह बंद असल्यामुळे महिलांची , मुलींची कुचंबणा होते. स्वच्छतागृह बंद असल्यामुळे पर्यटकांना खाजगी घरमालक , हाॕटेलवाले यांचेकडे कपडे बदलायला व वाॕशरूमला जावे लागत आहे. तसेच येथे पर्यटकांकडून घेतला जाणाऱ्या करापोटी काय सुविधा दिल्या जातात , ते दिसून येत नाही.

मुख्य चौकातीलच काॕक्रीटीकरणाचे काम रखडले आहे , त्यामुळे भाजे ग्रामपंचायतीचे व काम करणा-या ठेकेदाराचे दूर्लक्ष होत आहे, असे काही ग्रामस्थांतर्फे सांगण्यात आले. पाणीपुरवठ्याबाबत ही आठ आठ दिवस पाणी वेळेवर सोडले जात नाही. पाऊस सतत पडत असूनही लोकांना पाणी वेळेवर सोडले जावे , अशी मागणी करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!