कृषीवार्ताताज्या घडामोडीपर्यटनमहाराष्ट्रसामाजिक

सीआरपीएफचे कमांडंट पारसनाथ यांच्या हस्ते भाजेमधे वृक्षारोपन…

हम जवान कश्मिर मे जाते है ,तो आतंकवादीयोसे लढते है ! छतिसगड जाते है तो दुष्मनोंसे लढते है , मकसद एकही होता है ! सब लोग भयमुक्त , डरसे मुक्त रहे ! सुखशांतीसे रहे , समाधानसे रहे :

Spread the love

सीआरपीएफचे कमांडंट पारसनाथ यांच्या हस्ते भाजेमधे वृक्षारोपन…CRPF Commandant Parasnath planted trees in Bhaje…

हम जवान कश्मिर मे जाते है ,तो आतंकवादीयोसे लढते है ! छतिसगड जाते है तो दुष्मनोंसे लढते है , मकसद एकही होता है ! सब लोग भयमुक्त , डरसे मुक्त रहे ! सुखशांतीसे रहे , समाधानसे रहे :

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर, मावळ प्रतिनिधी, १८ जुलै.

हम जवान कश्मिर मे जाते है ,तो आतंकवादीयोसे लढते है ! छतिसगड जाते है तो दुष्मनोंसे लढते है , मकसद एकही होता है ! सब लोग भयमुक्त , डरसे मुक्त रहे ! सुखशांतीसे रहे , समाधानसे रहे :सीआरपीएसचे चे कमांडंट पारसनाथ यांनी प्रतिपादन केले.

भाजे , मळवली येथील व्हिपीएस संचलित श्रीमती शांतीदेवी गोपीचंद गुप्ता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भाजेमधे सीआरपीएफचे कमांडंट चे हस्ते वृक्षारोपन संपन्न झाले. भाजेतील श्रीमती शांतीदेवी गोपीचंद गुप्ता माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आणि श्री विद्या बालक मंदिर, भाजे शाळेच्या मैदानाजवळ वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला.

सीआरपीएफ, पुणे २४२ बटालियन चे कमांडंट  पारस नाथ साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजे हायस्कूलमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
त्याच अनुषंगाने भाजे हायस्कूलमध्ये सुमारे ८० रोपांचे वृक्षारोपण करण्यात येणार असून , सुमारे दहा रोपांचे प्रमुख पाहुणे यांचे हस्ते वृक्षारोपन करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे.पारसनाथ म्हणाले , “सीआरपीएफने यावर्षी १२००० वृक्षारोपन चे उद्दीष्ठ दिले असताना , आम्ही १४हजार हजार झाडे लावण्याचा संकल्प करत आहोत. आम्हाला वृक्षारोपन करायला जमिनीची कमतरता भासते.आमच्या तर्फे रेव्हेनू खात्याचे आम्ही आभार मानतो.महाराष्ट्र व राजस्थानमधे पहाता वृक्षांची तोड जास्त होताना दिसते.त्यामुळे प्रदुषण वाढत आहे.डेव्हलपमेंट होताना , वृक्षांची तोडही मोठ्या प्रमिणात होत आहे.वृक्षारोपन केले ; तरच पर्यावरणाचे संतुलन राखले जाईल.तीन चार वर्षापर्यत वाढेल असे रोप लावले , राखले ;तर ते आपल्याला शंभर वर्षे सावली वआॕक्सिजन व फळे देत राहीन.एक वृक्ष दहापुञासमान आहे ! आम्हि सांगू इच्छितो , की धकाधकीचे जिवनात जर कुणाला रक्ताची गरज लागली , तर जरूर आम्हाला सांगा.त्वरीत रक्त दिले जाईल.

याप्रसंगी सीआरपीएफचे डेप्युटी कमांडंट  कृष्णकांत झा साहेब व सीआरपीएफ चे २४२ बटालियनचे असिस्टंट कमांडंट  अमित आखारे  कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या वेळी कृष्णकांत झा म्हणाले , ” आपल्याकडून वृक्षारोपन करून ती वाढविणे हे आपले आद्य कर्तव्य आहे.हे शिक्षकांनी मार्गदर्शन केल्यामुळे विद्यार्थी करतील. कुटूंबाचे सदस्यासह वीर जवान या मंचावर उपस्थित आहे. आपण या पृथ्वीपर होत असलेल्या नद्यांच्या पाणी प्रदूषणाबाबत अधिक विचारविनिमय व कार्यवाही करायला हवी आहे.काही राज्यामधे पाणीटंचाई निर्माण होताना दिसते , तर काही प्रदेशात महापूराची संकटे येतात,हे वृक्षांची कत्तल केल्याने होत आहे. एक घोषणा द्या.. माॕ भारतमाता करे पुकार ! ! पौधा लावो ! ! जीवन को सार्थक बनाओ ! पेड पौधा देगी जीवन ! ! एक पेड दसपुञ समान ! !

पारस नाथ साहेब ,  कृष्णकांत झा  व  अमित आखारे सर यांनी आपल्या मनोगतातून पर्यावरण रक्षण व संवर्धन यांचे महत्त्व विशद केले . तसेच झाडे लावण्याबरोबर झाडे जगवली पाहिजेत यावर विशेष भर दिला.यावेळी असिस्टंट कमांडंट.आखारे म्हणाले ” काश्मीर ते लक्षद्वीप आणि देशाच्या सर्व सिमेवर ही सुरक्षेसाठी आमचे सर्व सीआरपीएसचे चे जवान सदैव तैनात असतात. छञपतींचे काळामध्ये त्यांनी जंगले , झाडे , डोंगर , गडकिल्ले यांचा अत्यंत योग्य असा उपयोग करून घेतला होता , म्हणून ते सर्व लढाईत जिंकले .आपण काश्मीर ते लक्षद्वीप, कन्याकुमारी , हिमालय पर्वत असे पर्यावरणाचे दृष्टीने पाहून वृक्षारोपन करणेकामी प्रयत्न करू !

या कार्यक्रमासाठी वि.प्र. सभेचे प्रतिनिधी म्हणून नियामक मंडळाचे सदस्य भगवान आंबेकर सरांनी मार्गदर्शन करीत शाळेचा इतिहास सांगितला. ३० डिसेंबर २०२२ला शाळेला शंभर वर्षे पूर्ण होत आहे. ते म्हणाले , १४ विद्यार्थी ते १हजार विद्यार्थी हा टप्पा फार मोठा आहे.समाजासाठी कार्य हाती घेतल्याने हे शक्य झाले आहे. ते पुढे म्हणाले , “संस्थेच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. मृणालिनी गरवारे , कार्यवाह डॉ. सतीश गवळी व सहकार्यवाह विजय भुरके यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची वाटचाल योग्य दिशेने सुरू असल्याचे सांगितले.

शाळेचा उद्येश व्यवसायिक नसून समाजातील तळागाळातील विद्यार्थी , विद्यार्थीनी यांना शिक्षण घेता आले पाहिजे , शाळेच्या प्रारंभी शाळा सुरू करताना मला विचारले आसता , आम्ही माजी सरपंच उस्मानशेठ इनामदार यांचे बंगल्यात , घराजवळ चौदा नापास झालेल्या विद्यार्थांना शोधून आणून शाळा सुरू केली.आज एक हजाराचे वर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

यावेळी शाळा समिती सदस्य माजी सरपंच  उस्मान इनामदार साहेब कार्यक्रमास उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे माजी विद्यार्थी व मळवली पंचक्रोशीतील प्रसिद्ध उद्योजक व शिवसेना युवासेना पदाधिकारी  विजय तिकोणे यांनी विशेष परिश्रम घेतले. तिकोणे भाषणात म्हणाले , विद्यार्थी मिञांनो माझ्या मते वृक्षारोपन दरवर्षी आपण करतो , असे न करता , वृक्षांची तोड केली नाहीतर जंगल सुरक्षित राहील. वनवे लावले नाही पाहिजे , निसर्ग वाचवला , तर आपण भविष्यात पाणी, पाऊस पडल्याने व्यवस्थित जीवन जगू शकतो.

याप्रसंगी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर विजय उपाध्ये आणि सीआरपीएफ २४२ बटालियनचे सुमारे ४० जवान त्यांच्या कुटुंबीयांसह कार्यक्रमासाठी उपस्थित होते. प्रशालेचे प्राचार्य संतोष पवार व  विद्या बालक मंदिर च्या मुख्याध्यापिका. स्वाती रगडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रशालेचे पर्यवेक्षक मकरंद गुर्जर यांनी केले.कार्यक्रमासाठी फलक लेखन व सुंदर सजावट प्रशालेतील कलाशिक्षक धुळाजी देवकाते, विजय कवडे, सीमा सिंग, सुषमा येवले, काजल रणदिवे, शिल्पा आंबेकर व अनुजा वाघमारे यांनी केली. प्रशालेतील इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थिनींनी सुरेल आवाजात ईशस्तवन व स्वागतगीत सादर करीत कार्यक्रमाची प्रसन्न सुरुवात केली. आलेल्या सर्व मान्यवरांचे ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले व पारंपारिक पद्धतीने औक्षण करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी प्रशालेतील शिक्षक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. त्यामध्ये गहिनीनाथ बारगजे, संभाजी तुपे, कविता गायकवाड, पर्यावरण समिती प्रमुख बाळासाहेब कोकणे, सुरेखा अहिरे, ललिता पवार, राजेंद्र होले, प्रशांत घाडगे, परमेश्वर खाटपे, मुकुंद भोसले, बाळू शिरसाट, देविदास खेडकर, गणेश गायकवाड, मनीषा जगताप व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर सेवकांनी परिश्रम घेतले. ध्वनि व्यवस्था श्रीराम तांदळे यांनी चोख बजावली. रोहिदास डिकोळे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमासाठी पत्रकार मित्रांनी आवर्जून उपस्थिती लावली. यावेळी सीआरपीएफचे जवान व त्यांच्या बायका , मुले यावेळी कार्यक्रमास उपस्थित होते.

सर्वांना चहापान व अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता झाली. .शाळेत एक हजाराचे वर शिशुवर्ग ते बारावीचे वर्ग असून प्रशस्त सभागृह नसल्याने एका वर्गामध्ये हा कार्यक्रम मोठ्या सुरक्षेमधे घेण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!