आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणसामाजिक

रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी व स्माईल व्यसनमुक्ती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर संपन्न..

७२ रक्तदात्यांनी केले रक्तदान..

Spread the love

रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी व स्माईल व्यसनमुक्ती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर संपन्न; ७२ रक्तदात्यांनी केले रक्तदान..Blood Donation Camp held in association with Rotary Club of Talegaon Dabhade City and Smile Addiction Center; 72 blood donors donated blood..

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, १९ जुलै.

रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी व स्माईल व्यसनमुक्ती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने उर्से येथे पिंपरी चिंचवड ब्लड बँक सेंटर यांच्या सहकार्याने रक्तदान शिबीर घेण्यात आले. रविवारी सकाळी नऊ ते दुपारी तीन या कालावधीत झालेल्या या शिबिरात ७२ पाऊच रक्त संकलन करण्यात आले.

रोटरी क्लब ऑफ तळेगांव दाभाडे   सिटी व स्माईल व्यसनमुक्ती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने उर्से येथे पिंपरी चिंचवड ब्लड बँक सेंटर यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.वैद्यकीय क्षेत्रात सध्या रक्ताची मोठ्या प्रमाणात गरज आहे हे जाणून या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून हा स्तूत्य उपक्रम घेण्यात आला.रविवार १६ जुलै रोजी सकाळी ९ते ३ या वेळेत  रक्तदात्यांनी रक्तदान करून ७२ पाऊच  रक्त रक्तपेढीला सुपुर्त करण्यात आले.

रोटरी सिटीचे अध्यक्ष सुरेश शेंडे, चार्टर्ड प्रेसिडेंट विलास काळोखे, सेक्रेटरी भगवान शिंदे,प्रकल्प प्रमुख हर्षल पंडित,संजय मेहता,संतोष शेळके,संजय वाघमारे,तानाजी मराठे यांच्या हस्ते रक्तदान करणारास प्रत्येकाला हेल्मेट देण्यात आली तर सर्व डॉक्टर्स व स्टाफ यांना रोटरी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प प्रमुख रो.हर्षल पंडीत यांनी केले तर अध्यक्ष सुरेश शेंडे, संस्थापक अध्यक्ष विलास काळोखे, संजय मेहता, संतोष शेळके‌ यांनी शुभेच्छा दिल्या आभार सेक्रेटरी भगवान शिंदे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!