अध्यात्मिकआपला जिल्हासामाजिक

कोणतेही कार्य करताना गुरूंचे आशीर्वाद फार महत्त्वाचे. मा.आ.मेधा कुलकर्णी..

परमपथ अध्यात्मिक चातुर्मास २०२३ - श्री जीरावला पार्श्वनाथ जैन मंदिर,तळेगाव दाभाडे..

Spread the love

कोणतेही कार्य करताना गुरूंचे आशीर्वाद फार महत्त्वाचे.
मा.आ.मेधा कुलकर्णी..Guru’s blessings are very important in doing any work.MA Medha Kulkarnii.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, १९ जुलै.

कोणतेही कार्य करताना गुरूंचे आशीर्वाद फार महत्त्वाचे असतात आणि त्यासाठीच मी गुरूंचे आशीर्वाद घेण्यासाठी आज तळेगाव दाभाडे येथील जैन मंदिरामध्ये चातुर्मास निमित्त विराजित परमपूज्य गुरुदेव पियुषचंद्र विजयजी महाराज, परमपूज्य गुरुदेव रजतचंद्र विजयजी महाराज व परमपूज्य गुरुदेव प्रितियशचंद्र विजयजी महाराज  यांचे आशीर्वाद घेण्यासाठी व नवीन ऊर्जा निर्माण करण्यासाठी मी आज आले आहे असे उद्गार माजी आमदार मेधाताई कुलकर्णी यांनी केले.

तळेगाव दाभाडे शहरातील जिरावला पार्श्वनाथ जैन मंदिर या ठिकाणी आज भेट देण्यासाठी माजी आमदार मेधाताई कुलकर्णी माजी आमदार नरसिंग मेघजी भाजपा पुणे शहर सरचिटणीस. अनिताताई तलाठी,पुणे जिल्हा भाजप अल्पसंख्यांक आघाडीचे माजी अध्यक्ष मोहन बागमार हे सर्वजण गुरूंचे आशीर्वाद घेण्यासाठी आज आले होते.
भारताला प्रबळ व आधुनिक शक्तिशाली देश निर्माण करण्यासाठी साधुसंतांचे आशीर्वाद फार महत्त्वाचे असतात देशाला हिंदू राष्ट्राकडे नेण्यासाठी साधुसंतांनी आशीर्वाद द्यावेत असे प्रतिपादन माजी आमदार नरसिंग मेघजी यांनी केले.

सांसारिक जीवन सोडून संयम जीवनग्रहण केल्यानंतर आम्ही धर्मवाढी साठी प्रयत्न करत असतो व सामाजिक व राजकीय आयुष्यात आपल्यासारखे कार्यकर्ते पुढे येऊन सामाजिक व धार्मिक कार्य करतात हे समाजासाठी फार महत्त्वाचे आहे असे परमपूज्य गुरुदेव पीयुषचंद्र विजयजी महाराज यांनी आशीर्वाद पर आपल्या प्रवचनामध्ये केले.

जिरावला पार्श्वनाथ जैन संघाच्या वतीने सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला यावेळी तळेगाव शहरातील सकल जैन समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!