आपला जिल्हाराजकीय

भारतीय जनता पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी शंकर जगताप यांची वर्णी..

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली नियुक्ती..

Spread the love

भारतीय जनता पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी शंकर जगताप यांची वर्णी; भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली नियुक्ती.. Shankar Jagtap nominated as Pimpri Chinchwad City President of Bharatiya Janata Party; Bharatiya Janata Party State President Chandrasekhar Bawankule appointed..

आवाज न्यूज : पिंपरी चिंचवड प्रतिनिधी, १९ जुलै.

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शंकर जगताप यांची भारतीय जनता पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातील भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष,बदलण्यात आले आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील भारतीय जनता पक्षाचे विद्यमान शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या ऐवजी आता शंकर जगताप यांची भारतीय जनता पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी वर्णी लागली आहे.महेश लांडगे यांचा पिंपरी चिंचवड भाजप शहराध्यक्ष पदाचा कार्यकाल काही महिन्यापूर्वी पूर्ण झाल्याने, पिंपरी चिंचवड शहरातील भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष बदलण्यात यावा अशी मागणी होत होती.

त्यासाठी भारतीय जनता पक्ष अंतर्गत शंकर जगताप यांच्यासोबत इतर काही पदाधिकाऱ्यांची नाव चर्चेत होती. मात्र अखेर चंद्रशेखर बावनकुळे यांनी चिंचवड विधानसभेचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांना पिंपरी चिंचवड भाजप शहर अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे येत्या महानगरपालिका निवडणुकीत शंकर जगताप यांच्यावर शहराच्या राजकारणातील मोठी जबाबदारी असणार आहे. आणि त्याचा फायदा नक्कीच भा.ज.पा. लाभ होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!