आंदोलनताज्या घडामोडी

दुपारच्या लोकलगाड्या सोडाव्यात या मागणीसाठी    लोणावळा रेल्वेस्टेशनला डेक्कन क्विन २० मी. रोकन्यात आली. 

रेल्वे प्रशासनाने नागरिकांच्या मागणी संदर्भात, लौकरच निर्णय घ्यावा अन्यथा मावळ तालुक्यातुन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. बापुसाहेब भेगडे, उपाध्यक्ष संत तुकाराम सहकारी साखर कारखाना

Spread the love

दुपारच्या लोकलगाड्या सोडाव्यात या मागणीसाठी    लोणावळा रेल्वेस्टेशनला डेक्कन क्विन २० मी. रोकन्यात आली. Deccan Quinn 20m to Lonavala railway station for the demand to release afternoon local trains. was stopped.रेल्वे प्रशासनाने नागरिकांच्या मागणी संदर्भात, लौकरच निर्णय घ्यावा अन्यथा मावळ तालुक्यातुन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. बापुसाहेब भेगडे, उपाध्यक्ष संत तुकाराम सहकारी साखर कारखाना 

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी, १२ जानेवारी.

मध्यरेल्वेने लोणावळा ते पुणे दरम्यान दुपारच्या लोकलगाड्या सोडाव्यात या मागणीसाठी ता.१२ रोजी लोणावळा रेल्वेस्टेशनला रेलरोकोचे आयोजन करण्यात आले लोणावळ्यात सर्वपक्षिय बंदचे अवाहन करण्यात आले होते.

दुपारच्या लोकलगाड्या सोडाव्यात या मागणीसाठी    लोणावळा रेल्वेस्टेशनला डेक्कन क्विन २० मी. रोकन्यात आली व रेल्वे प्रशासनाचा धिक्कार असो, हमारी मांगे  पुरी करो जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत आंदोलन सुरू होते.

कोरोनाचा काळ संपून अनेक महिने व वर्षे लोटली, अद्याप कोरोनाच्या काळात बंद केलेल्या दुपारी अकरा ३५ , दोन वाजताचे लोणावळा, पुणे लोकल व पुण्यावरून सुटणा-या दुपारच्या लोकल गाड्या सायंकाळी ५.१७ च्या लोकलआधी असलेल्या लोकल बंद असून त्यामुळे लोकलने प्रवास करणाऱ्यांची गैरसोय होत आहे.

कर्जत बारामती शटलही बंद आहे. त्यामुळे रेल्वेप्रवाशांना मोठा ञास सहन करावा लागत असून या लोकल सुरू कराव्यात , काही एक्स्पेस गाड्या खंडाळा मध्ये, त्याही लोणावळा स्टेशनला थांबवाव्यात अशी मागणी करण्यात आली.

रेल्वे प्रशासनाने नागरिकांच्या मागणी संदर्भात, लौकरच निर्णय घ्यावा अन्यथा मावळ तालुक्यातुन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष. बापुसाहेब भेगडे. यांनी लोनावळा येथील प्रशासनास दिला.

यावेळी लोणावळा येथील स्थानिक नागरिक तसेच किरण गायकवाड,  बापुसाहेब भेगडे, मच्छिंद्र खराडे, यांच्या बरोबर शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!